राज्यात होळीपूर्वीच उन्हाचा चटका वाढवणार

185
Adv

राज्यातील अनेक ठिकाणी सध्या तापमानाचा पारा ३५ अंशावर गेला असून यामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. गेल्या २४ तासात राज्यातील रत्नागिरी येथे देशातील सर्वाधिक ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तर शनिवारी जळगावचे कमाल तापमान ३४.५ अंश इतके होते. दरम्यान यातच हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा दिलाय.

तर २३ ते २४ फेब्रुवारी दरम्यान काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. सद्य:स्थितीला दुपारपर्यंत पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे आणि नंतर उत्तर-पश्चिमेकडून येणारे कोरडे वाऱ्यांमुळे तापमानातील फरक वाढतो आहे.

राज्यात कुठे पाऊस, कुठे तापमान वाढणार?रविवार आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आकाश ढगाळ होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने म्हटलंय.

Adv