राज्यातील सर्व आमदारांना छावा चित्रपट दाखणार

229
Adv

राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होत आहे. त्यानंतर ४ आणि ५ मार्च रोजी सर्व आमदारांना मंत्रालयसमोर असलेल्या चित्रपट गृहात हा चित्रपट दाखवणार असल्याचे अजित पवार यांनी दिल्लीत सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर असलेल्या छावा चित्रपटाचे कौतूक सर्वत्र होत आहे. दिल्लीतील साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. छावा चित्रपटामुळे समाजापुढे संभाजी राजांची ओळख देशभरातील युवा पिढीला झाली. आता या चित्रपटासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा चित्रपट पाहिला. त्यानंतर आता राज्यातील सर्व आमदारांना छावा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली चर्चा झाली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होत आहे. त्यानंतर ४ आणि ५ मार्च रोजी सर्व आमदारांना मंत्रालयसमोर असलेल्या चित्रपट गृहात हा चित्रपट दाखवणार असल्याचे अजित पवार यांनी दिल्लीत सुरु असलेल्या अखील भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी सांगितले.

Adv