साताऱ्यात सध्या दांडिया ठिकठिकाणी होणार असून राधिका चौकालगत होणाऱ्या दांडिया मुळे प्रचंड आसपासच्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोर जावे लागते याचबरोबर कर्ण कर्कश्य आवाजाचाही प्रचंड त्रास होत असून यावर पोलीस प्रशासन गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे
गणेश उत्सवाच्या दरम्यान डेसिबलची मर्यादा पाळा म्हणून सांगणारे ज्येष्ठ नागरिक पोलीस प्रशासन दांडियाच्या काळात मात्र गप्प असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे
गणेशोत्सव आला की आवाजाची मर्यादा पाळा असे सांगणाऱ्या प्रचंड भूछत्र्या उगवल्या होत्या जसा पाऊस गायब झाला तस्या या छत्र्या पावसाप्रमाणे गायब झाल्या त्यामुळे नक्की कुठे माशी शिंकली हे कळायला मार्ग नाही