पत्रकार प्रशांत जगताप हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल

248
Adv

साताऱ्यातील लोकशाही न्युज चॅनलचे पत्रकार आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी प्रशांत जगताप यांच्यावर भ्याड हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी हर्षल चिकणे याच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान,साताऱ्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.

सातारा शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला पत्रकार प्रशांत जगताप हे गेले असता हर्षल चिकणे या व्यक्तीने जुना राग मनात धरून त्याठिकाणी येऊन त्यांच्यावर भ्याड हल्ला केला.या भ्याड हल्ल्यांमध्ये प्रशांत जगताप हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले होते. पत्रकार प्रशांत जगताप यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची माहिती समजताच साताऱ्यातील सर्व पत्रकारांनी सातारा शहर पोलीस स्टेशन येथे जमा होऊन या भ्याड हल्ल्याप्रकरणी निषेध व्यक्त करत हल्लेखोराला तत्काळ अटक करावी अशी मागणी उपस्थित पत्रकारांनी केली.
दरम्यान, या पत्रकार हल्ल्याप्रकरणी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे यांनी तत्काळ फोनवरून पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी चर्चा करून सदर हल्लेखोर व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
सर्व पत्रकारांनी केलेल्या मागणीनंतर सातारा शहर पोलिसांनी हल्लेखोर हर्षल चिकने याच्याविरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

सदर घटनेची माहिती समजताच मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी ,सचिव दीपक प्रभावळकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे ,सचिव पद्माकर सोळवंडे,जिल्हा सदस्य संदीप शिंदे ,चंद्रसेन जाधव , विठ्ठल हेंद्रे,सातारा शहराध्यक्ष प्रतीक भद्रे, उपाध्यक्ष साई सावंत, सचिव गुरुनाथ जाधव, खजिनदार अमोल निकम, पत्रकार महेश पवार,विनीत जवळकर,प्रमोद इंगळे प्रकाश शिंदे ,महेश क्षीरसागर,निखिल मोरे,संजय सुपेकर,वैभव बोडके ललित लोखंडे संजय कारंडे ,किरण मोहिते, प्रशांत बाजी ,ओंकार सोनावले,रिजवान सय्यद,तबरेज बागवान,जावेद खान, प्रकाश वायदंडे,मृणाल देवकुळे,कुणाल खंदारे,संतोष कांबळे, मंगेश कुंभार,नंदकिशोर निपाने,मिलिंद लोहार यांच्यासह साताऱ्यातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यामध्ये गणेश अहिवळे ,गणेश दुबळे,अशोक गायकवाड ,सागर भोगावकर ,धनंजय जांभळे ,विजयकुमार काटवटे ,कल्याण राक्षे, संजय पवार ,यांनी उपस्थित राहून तीव्र निषेध व्यक्त केला.

Adv