शिवतीर्थ सुशोभिकरणासाठी 8 कोटीचा निधी प्राप्त

546
Adv

शिवप्रभुंच्या दिगंत ख्यातकिर्तीला साजेसा साताराचा शिवतीर्थ परिसर असावा म्हणून वाढीव निधी दयावा अशी आग्रही मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचेकडे केली. आमची आग्रही मागणी,सातत्याचा पाठपुरावा आणि शिवप्रेमी मुख्यमंत्री यांच्या संयोगातुन, रुपये 08 कोटींचा भरीव आणि भरघोस
निधी शिवतीर्थाचे सुशोभिकरणासाठी आजच प्राप्त झाला आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.

सातारा नगरीला शिवप्रभुंच्या जाज्वल्य इतिहासाची महान परंपरा लाभली आहे. शिवप्रभुंच्या या भुमीत पोवई नाक्यावरील (शिवतीर्थ) पूर्णाकृती पुतळा सातारकरांनाच नव्हे तर येथुन जाणा-या येणा-या प्रत्येक व्यक्तीस सातत्याने प्रेरणा देत आहे. या परिसराचे सुशोभिकरणाचे काम आम्ही हाती घेतले.याकामास प्रथमजिल्हा नियोजन मधुन निधी सुमारे 3 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन घेतला.कामास सुरुवात करण्यात आली. तत्कालीन पालक मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे यावेळी सहकार्य लाभले.

राजधानी सातारा या नावाला साजेसा शिवतीर्थ परिराच्या सुशोभिकरणाचे या कामासाठी निधीची गरजहोती. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचेकडे आम्ही सुशोभिकरणासंबंधी नगरपरिषदेने सादर केलेल्याप्रस्तावाला मंजूरी देण्याबरोबरच जलद निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी केली. त्यावेळी ना.शिंदे यांनी शिवतीर्थाचे सुशोभिकरणास निधी कमी पडू देणार नाही असे ठोस आश्वासन देखिल दिले.त्याप्रमाणे आज नगरविकास खात्याने शिवतीर्थ, सुशोभिकरणासाठी वैशिष्टयपूर्ण योजनेमधुन 8 कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे.अखिल समाजाला सातत्याने प्रेरणा मिळत राह ण्यासाठी शिवतीर्थावरील शिवप्रभुंच्या पूर्णाकृती पुतळापरिसराचे सुशोभिकरणाला अधिक चालना मिळेल. नागरीकांना दैनंदिन जीवनात सातत्याने उर्जा देणारे चिरकालीन प्रेरणास्थानप्रभावशील उठावदारपणे सुशोभित होईल.यामाध्यमातुन शिवकार्याकरीता आम्हाला काही तरी थोडंफार करता आले याचा मनस्वी आनंद आहे. राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि जिल्याचे
पालकमंत्री यांचेसह सर्वांचे आभार असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.

Adv