पिस्तूल लावल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल

82
Adv

सातारा : शहर परिसरातील एका युवतीचा विनयभंग करून भावाला पिस्तूल व कोयत्याचा मारहाण केल्याप्रकरणी सुमारे दहा जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या विरोधात कोयत्याने मारहाण व पिस्तूलीचा धाक दाखवून सात तोळे सोन्याची साखळी लंपास केल्याप्रकरणी सात जणांवर परस्परविरोधणी गुन्हा दाखल करण्यसात आला आहे.
युवतीच्या फिर्यादीनुसार पप्पु उर्फ संजय लेवे, निखील वाघ, धनंजय शिंदे, आर्यन लेवे, गोट्या उर्फ माधव शिंदे, स्वप्नील चव्हाण, यश घाडगे व त्यांच्या तीन ते चार साथीदारांवर हा गुन्हा दाखल झाली आहे.
सहा सप्टेंबरला साडेअकराच्या सुमारास शाहूपुरी येथील देवी चौकात भावासोबत गणपती दर्शनासाठी गेलो होतो. त्या वेळी पप्पु लेवे, निखील वाघ, धनंजय शिंदे, आर्यन लेवे, गोट्या उर्फ माधव शिंदे, स्वप्नील चव्हाण, यश घाडगे आणि त्यांच्यासोबत तीन ते चार जण हे आमच्या पाठीमागुन आले. तेंव्हा पप्पू लेवे याने माझ्या पाठीमागुन येवुन माझ्या पाठीवरुन हात फिरवुन मला मिठी मारुन विनयभंग केला. तेंव्हा त्याला भावाने त्रास देऊ नका असे सांगितले. तेंव्हा अन्य संशीतांनीही तीचा विनयभंग केला. तसेच कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर काल पहाटे दोनच्या सुमारास संशयीतांनी गडकरआळी येथे भावाला हाताने व काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. काल दुपारी बाराच्या सुमारास संशयीतांनी प्रकरण मिटवून घेण्यासाठी अनंत इंग्लीश स्कुल चौकात धनंजय अँटो गँरेज येथे बोलावले. तेथे त्यांनी भावाला व त्याच्या मित्राला लाथाबुक्यांनी, काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर पप्पु लेवे भावाच्या डोक्याला पिस्तूल लावून जिवे मारण्याची धमकी देत खिशातून दहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी फिर्याद पप्पू लेवे यांनी दिली आहे. त्यानुसार विश्वजित ऊर्फ सोन्या जाधव, विक्रम ऊर्फ बंडा जाधव, शुभम ऊर्फ सोन्या ऊर्फ गहुल्या जाधव, अनुज पाटिल, सुभाष जाधव), रुतुराज शिंदे, य़श साऴुंखे व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. अनंत इंग्लिश स्कुल चौकातील धनंजय अँटो गँरेज या ठिकाणी कामगारांचे पगार करत होतो. या वेळी संशयीतांनी यश घाडगे व रूतुराज शिंदे यांची भांडणे का मिटवली असे म्हणुन कोयत्याने व पाईपने मारहाण केली. तसेच गळ्यातील सात तोळे सोन्याची साखळी हिसकावून लंपास केली. त्याचबरोबर विश्वजित ऊर्फ सोन्या जाधव याने त्यांचे कमरेतील पिस्तूल माझ्या डोक्याला लावून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच भांडण सोडवायला आलेल्यांना पिस्तूलाने धमकावले असे लेवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Adv