पालिकेच्या वेबसाईटचे व मोबाईल ॲपचे लोकार्पण

224
Adv

सातारा शहराच्या हद्दीतील मालमत्ता कराच्या मूल्यांकनात सुलभता यावी व एका क्लिकवर नागरिकांना सुविधा प्राप्त व्हाव्यात या दोन्हीसाठी सातारा पालिकेच्यावतीने सातारा हे मोबाईल ॲप सुरू करण्यात आले आहे व नगरपालिकेची वेबसाईट लोकार्पण करण्यात आल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिली

शिवजयंतीच्या मुहूर्तावर या सुविधा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले याबाबतच्या प्रसिद्ध पत्रकार नमूद आहे की सातारा नगरपालिका डॉट इन या नावाची वेबसाईट व माय सातारा नावाचे मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करण्यात आले आहे

ही सुविधा अँपल स्टोअर वर सुद्धा उपलब्ध होणार आहे नागरिकांना मालमत्तेचे स्वयं मूल्यांकन करणे नगरपरिषदेच्या विशेष सेवा ऑनलाईन कर भरणे सभा येथे वृत्त विकास अर्थसंकल्प यांची माहिती उपलब्ध करून घेणे निविदा सूचना विषयी कामकाज माहिती करून घेणे तक्रार दाखल करणे सर्व विभागास संपर्क व माहिती उपलब्ध करणे सातारा नगरपरिषदेच्या मार्फत दिली जाणारी माहिती प्रसिद्ध करणे व नागरिकांना सूचना व अभिप्राय नोंदवण्यासंदर्भात या सुविधांचा वापर केला जाणार आहे सातारा नगरपालिकेच्या प्रथमच मालमत्ता कर मूल्यांकनाबाबत सुलभता यावी व स्वयं मूल्यांकन सुविधा नागरिकांना उपलब्ध व्हावी या सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध राहणार आहेत पालिकेच्या संगणक अभियंता अस्मिता पाटील यांनी यासंदर्भात विशेष परिश्रम घेतले आहे नगर परिषदेने विकसित केलेले वेबसाईट व ॲपचा सातारकर यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे

Adv