सातारा पालिकेच्या जुना मोटर स्टँड परिसरातील जागेवर दोन पेट्रोल पंप असून या पंप चालकांनी गेल्या वीस वर्षा पासून सातारा पालिकेसह सातारकरांची फसवणूक केली असून यावर पालिकेची कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे
सातारा पालिकेची मिळकत असलेला जुना मोटर स्टँड या परिसरात सातारा पालिकेच्या जागेत दोन पेट्रोल पंप पासून या पंप चालकांनी सातारा पालिकेसह सातारकरांची फसवणूक केली असून गेल्या वीस वर्षापासून एक रुपयाचा ही कर भरला नाही व सातारा पालिकेशी केलेल्या कराराचा भंग केला असून स्वतः मात्र गडगंज होऊन सातारा पालिकेचे नागरिकांची फसवणूक केल्याचे दिसून येते
वीस वर्षात लक्ष्मी दर्शन घेणाऱ्यांची संख्या किती
गोरगरिबांची घरपट्टी रखडली तर सातारा पालिका कारवाई करते मात्र दिवसाढवळ्या सातारकरांना फसवणाऱ्या दोन पेट्रोल पंप चालकांना अभय का दिले गेले वीस वर्षात किती जणांनी लक्ष्मी दर्शन घेऊन हा प्रश्न पुढे ढकला हाही मुद्दा उपस्थित होत असून सातारा पालिकेच्या स्थावर जिंदगी विभागाने यावर कारवाई करून आपला विभाग अस्तित्वात असल्याची भूमिका स्पष्ट करावी अन्यथा विभागातील विश्वासच उडाला असल्याचे दिसून येते
संबंधित पेट्रोल पंपावर तक्रारी अर्ज झाल्यानंतर मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पेट्रोल पंप चालकांना 48 तासांची मुदत दिली होती ही मुदत संपून आता 48 तास झाले असून मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे