सातारा नगरपालिकेची 3 गुंठे जागा फुटका तलाव येथील एका बहुचर्चित बेकरी समोर असून सदरची जागा सातारा पालिकेच्या माजी अधिकाऱ्याने राहण्याच्या नावाखाली अतिक्रमण करून गिळण्याचा डाव असल्याचे दिसून येते.या सर्व गोष्टींकडे पालिकेचा शहर विकास मात्र तोंडावर बोट ठेवून गप्प असल्याचे दिसून आले आहे याबाबत शहरातील विविध राजकीय पक्षांनी तक्रारी अर्ज देऊनही शहर विभागातील प्रकाश शिर्के कारवाई करत नसतील तर या मागचा उद्देश काय हे मात्र समजू शकले नाही
मुख्याधिकारी बापट साहेब कर्तव्यदक्ष मात्र पालिकेतील अधिकारी मात्र कामचुकार असल्याचे या घटनेवरून दिसून येते शहरातील जवळपास सहाशे मिळकतींना शहर विकास विभागाने 52 /53 च्या नोटीस दिल्या आहेत यावर या विभागातील अधिकारी कारवाई करताना दिसून येत नाहीत त्यामुळे शहर अतिक्रमणाच्या विळख्यात चालले असल्याचे दिसून येते
पालिकेचा पूर्वी जकात नाका होता त्या जकात नाक्याचा इन्चार्ज या संबंधित अधिकाऱ्यांकडे होता त्यावेळी श्री गोडसे, प्रकाश शिर्के हे कर्मचारी त्यांच्या हाताखाली कार्यरत होते त्याच्यात उपकाराची परतफेड म्हणून हे संबंधित अधिकारी यांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करत नसून गेल्या काही महिन्यापूर्वी माजी अधिकारी यांना सातारा पालिकेने 52/53 नोटीस बजावली असून यावर शहर विकास व अतिक्रमण विभागाने कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे
माजी अधिकारी यांच्या विरोधात तक्रारीं शहर विकास मात्र गप्प
संबंधित अधिकारी यांना पालिकेने जागा किती दिली आता किती ते वापरतात याचा लेखाजोखा काही दिवसात समोर येईलच दुर्दैव इतकेच की सातारा पालिकेच्या शहर विकास विभागातील अधिकारी प्रकाश शिर्के या सर्व गोष्टींकडे काना डोळा करत असल्याचे दिसून येते सदरच्या जागेवर दोन मजली अनाधिकृत बांधकाम झाले आहे या सर्व गोष्टीला प्रकाश शिर्के यांची संमती होती का हे मात्र तपासावे लागेल गोरगरिबांना एक न्याय व अधिकारी वर्ग यांना एक न्याय कशासाठी असा प्रश्न सातारकर नागरिकांना पडला आहे