सातारा पालिकेचे 326 कोटी 51 लाखाचे अंदाजपत्रक प्रशासकीय सभेत मंजूर

339
Adv


सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेने सातारा शहराच्या विकासासाठी शुक्रवारी 325 कोटी 51 लाख रुपयांच्या अंदाज पत्रकाला मान्यता दिली . हद्दवाढी नंतर नव्याने तयार झालेल्या क्षेत्रांच्या पायाभूत विकासासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली . मात्र महसुल वाढी साठी कोणतेही विशेष प्रयत्न झाल्याचे जाणवले नाही . शहराच्या हद्दवाढी नंतरही मालमत्ता कराचे उत्पन्न 14 कोटी 50 लाख रुपये दर्शविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होते .

सातारा पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक अभिजीत बापट यांच्या अध्यक्षते खाली शुक्रवारी पालिकेच्या कमिटी हॉलमध्ये अंदाजपत्रकीय सभा पार पडली . यावेळी मुख्य लेखापाल आरती नांगरे , सहाय्यक लेखापाल हिम्मत पाटील , मुख्य अभियंता दिलीप चिद्रे , लेखापरीक्ष क कल्याणी भाटकर व एकनाथ गवारी , लेखा विभाग लिपिक भालचंद्र डोंबे व सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते . सर्वप्रथम आरोग्य पाणीपुरवठा आस्थापना जन्म मृत्यू व शहरविकास विभागाच्या यंदाच्या आर्थिक वर्षाच्या मागण्यांचा बापट यांनी आढावा घेतला . मुख्य लेखापाल आरती नांगरे यांनी प्रशासकीय सभेत पहिल्यांदाच बजेट सादर केले . त्यानंतर अंदाजपत्रकीय सभेमध्ये प्रशासक अभिजीत बापट यांनी बीज भाषण केले . पालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारती साठी भरघोस निधी येणार असल्याची घोषणा बापट यांनी यावेळी करत अंदाज पत्रकातील तरतुदींवर विश्लेषणं केले .अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार पालिकेने भांडवली आणि महसुली अनुदानावरच भिस्त ठेवली आहे . सरासरी एक रुपयातील 74 पैशाची नोंद भांडवली आणि महसु ली अनुदानासाठी दर्शविण्यात आली आहे . पालिकेचे स्व उत्पन्न 7 पैसे व्याज विलंब आकार १ पैसा इतर उत्पन्न 1 पैसा आणि ठेवी 9 पैसे दर्शविल्या आहेत . खर्चाच्या गटात विकास कामांसाठी 69 पैसे तर आस्थापना खर्च 22 पैसे मालमत्ता दुरुस्ती 2 पैसे , व्यवहार खरेदी 4 पैसे अनुदाने 1 पैसा असाधारण खर्च 1 पैसा संकीर्ण खर्च 1 पैशाची तरतूद झाली आहे . अनुदानां वरच सातारा शहराच्या विकासाची भिस्त असल्याचे एकंदर आकडेवारीवरून स्पष्ट झाले .

ताळेबंदा मध्ये आरंभीची शिल्लक 55 कोटी 12 लाख असून महसुली जमा 88 कोटी 67 लाख भांडवली जमा 182 कोटी 74 लाख दर्शवण्यात आली आहे . मुख्य लेखापाल आरती नांगरे यांनी 326 कोटी 51 लाख 3 हजार 373 रुपयांचे शिलकी बजेट सादर केले मात्र मूळ उत्पन्नां पेक्षा विकास कामांचा खर्च दुप्पट असल्याचे स्पष्ट झाले . करोनाच्या काळात घटलेली वसुली , चतुर्थ वार्षिक पाहणीचा खोळंबा , मोठ्या विकास कामांच्या योजनांची लोकवर्गणी तसेच शहराच्या हद्दवाढी नंतर पायाभूत सुविधांसाठी वाढलेला खर्च यामुळे सातारा पालिकेच्या तिजोरीची अवस्था आमदनी अठ्ठनी खर्चा रुपैय्या अशी झाली आहे . सर्व महसुली खर्च वजा जाता पुढील वर्षाअखेरीस पालिकेच्या तिजोरीत 2 लाख 90 हजार 076 रुपये शिल्लक राहणार आहेत .

वैशिष्टयपूर्ण तरतुदी

पालिका प्रशासकीय इमारत – 10 कोटी

आरोग्य सुविधा – 4 कोटी 55 लाख

पाणी पुरवठा विषयक सुविधा – 2 कोटी 15 लाख

निवृत्ती वेतन – 14 कोटी 75 लाख

कर्मचारी वेतन व भत्ते – 28 कोटी 73 लाख

शासकीय कर्ज फेड – 67 लाख

अजिंक्य तारा सुशोभिकरण – 20 लाख रुपये

पर्यावरण संतुलन – 20 लाख रुपये

महादरे तलाव सुशोभिकरण – 50 लाख रुपये

हद्दवाढीच्या क्षेत्राचा विकास – 15 कोटी

चारभिंती सुशोभिकरण – २० लाख

दिव्यांग कल्याणकारी योजना – 40 लाख

मागासवर्गीय व महिला बाल कल्याण निधी – 78 लाख

Adv