सातारा पालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हॉटस्पॉट चे मालक यांनी भलेमोठे पायाड उभे करून काम सुरू केले होते कर्तव्यदक्ष सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी याप्रकरणी रुद्र अवतार घेत संबंधित हॉटस्पॉट चालकाचे काम बंद केले सातारानामा न्यूज व सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या दणक्यानंतर हॉटस्पॉट चे चालक यांनी काम करण्यासाठी परवानगीचा अर्ज पालिकेत दाखल केला आहे
शाहू चौक येथील हॉटस्पॉट या दुकानाने पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता भले मोठे शेड उभे केले होते सुशांत मोरे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सदरचे काम थांबले आता मात्र हॉटस्पॉटच्या चालकाने बोर्ड दुरुस्तीच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे
पालिकेची कोणतीही रीतसर परवानगी न घेता भाडेतत्त्वावर असलेल्या हॉटस्पॉट या दुकानाच्या मालकाने भले मोठे शेड उभारण्याचा पराक्रम केला सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी माहिती घेतली असता सदर दुकान मालकाने कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नाही व काम सुरू केले सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या आक्रमक पवित्त्र्या नंतर सदर दुकान मालकाने हे काम थांबवले व एकच खळबळ उडाली होती
दुकान मालकाला मोठा वरदहस्त असल्याची चर्चा सध्या साताऱ्यात रंगत असून नक्की कोणाच्या पाठिंब्याने दुकान मालकाने भले मोठे शेड उभारण्याचा पराक्रम केला हे मात्र कळायला मार्ग नाही