खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जुन्या नगरसेवकांना संधी देऊ नका अशी सोशल मीडियावर किरण कांबळे यांनी मागणी केली आहे
सातारा नगरपालिका निवडणूक सुरुवात झाली आहे. सर्वांचे लक्ष खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, मंत्री महोदय आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि भारतीय जनता पार्टी नक्की कोणाला उमेदवारी देणार याच्याकडे आहे. पण दोन्ही राजे आणि भारतीय जनता पार्टी यांना एक कळकळीची विनंती आहे. उमेदवारी देताना नवीन लोकांना संधी देण्यात यावी. विशेषतः प्रभाग क्र २१ मध्ये ३५ वर्षे नगरसेवकवेळा नगराध्यक्ष होऊन सुद्धा पुन्हा एकदा नगरसेवक होण्याची हाव कसली. गेले ३५ वर्षे नगरसेवक असून सुद्धा यांनी प्रभागात तेच रस्ते तेच गठार पुन्हा पुन्हा नवीन करून जनतेची फक्त फसवणूक केली. गेल्या ३५ वर्षात प्रभागातील वार्डातील किती मुलांना रोजगार निर्माण करून दिला?? किती मुलांना नोकरी लावण्यास मदत केली?? किती मुलांना किती मुलींना शिक्षणासाठी मदत केली?? भले ती मदत ऍडमिशन साठी का असेना. प्रभागातील किती तरुणांच्या अडचणीत त्यांच्या सोबत उभा राहिले शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन कोणत्या प्रकारच्या अडचणीत मदत केली??३५ वर्षाच्या नगरसेवक कारकिर्दीत किती कार्यकर्ते घडवले?? ठराविक दोन-तीन कार्यकर्ते सोडले तर आज युवा कार्यकर्त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी किती आणि काय मदत केली??
निवडणूक जवळ आली म्हणुन प्रभागात वह्या पुस्तकं वाटली म्हणजे नगरसेवक नाहीत. मुलांना शालेय उपायगी वस्तू दरवर्षी लागतात. निवडणूक जवळ आली की प्रभागातील मोजक्या लोकांना दारू मटणाची आखाडी केली की नगरसेवक होतो का?? निवडणूक जवळ आली की ठराविक गणेशोत्सव मंडळाना त्या मंडळात किती कार्यकर्ते आहेत तिथून किती मतदान मिळू शकतं याचा अभ्यास करून मग छोट्या मोठ्या पावत्या करून तात्पुरत खुश केलं की नगरसेवकांच काम झालं??
३५ वर्षांच्या नगरसेवक पदाचा वापर यांनी फक्त आणि फक्त स्वतः च्या स्वार्थासाठी स्वतः ची घरं भरण्यासाठी केला. नगरसेवक पदाचा वापर धनदांडग्यांची घरं, इमारती, दुकानाची बांधकामं त्यांचे परवाने काढण्यासाठी, तांत्रिक मंजुरी घेण्यासाठी केला. यांच्याकडे बांधकाम म्हणजे नगरपालिकेतून कोणतीही अडचण नाही असच. यांना आता अजून नगरसेवक होयचंय नगराध्यक्ष होयचंय शहराच्या आणि प्रभागाच्या विकासासाठी नाही तर फक्त एक रेकॉर्ड करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये झळकन्यासाठी. यांना प्रभागाच प्रभागातील लोकांचं काही एक देण घेणं नाही. पैशांच्या जीवावर यांना फक्त नगरसेवक होयचंय.
त्यामुळ दोन्हीह महाराज आणि भारतीय जनता पार्टी ला विनंती आहे की अशा स्वार्थी, हेकेखोर, आणि फक्त धनदांडग्यांचा फायदा करून देणारा उमेदवार देण्यापेक्षा नवीन व्यक्ती ला संधी द्यावी जो युवा पीडीचा विचार करेल युवा पिढीला सोबत घेऊन पुढे जाईल….. जय हिंद जय महाराष्ट्र







