नीलम गोऱ्हेंनी नाक घासून माफी.. सुषमा अंधारे कडाडल्या

72
Adv

दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर दोन मर्सिडीज घेऊन पदं मिळत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याच आरोपांवरून आता राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांचा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच सुषमा अंधारेंनी निलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे.

माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “नीलम गोऱ्हेंना ज्या पक्षानी चार वेळा आमदारकी दिली. त्यांनी त्यांच्या मॉडेल कॉलनीतील भागात शिवसेनेती एक साधी शाखाही उघडली नाही. त्यांनी माझा शिवसेनेत पक्षप्रवेश होऊ दिला नाही. माझा पक्षप्रवेश होईपर्यंत नीलम गोऱ्हेंच्या कानावर पडू दिलं नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
तसेच पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा हे सगळं काम नीलम गोऱ्हे बघायच्या… नीलम गोऱ्हेंनी आमदारकीसाठी मर्सिडीज दिल्या तर त्या कुठून आणल्या? नीलम गोऱ्हेंचा व्यवसाय काय, की त्यांची अडीचशे कोटींची संपत्ती आहे?, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना एसएफआयमधून केली. त्यानंतर भारिपमध्ये उडी मारली. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे त्यांना ओळख मिळाली. ईमानदारी, प्रामाणिकपणा त्यांच्या शब्दकोशात नाही.
प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांनी बेइमानी केली. तसेच शरद पवारांकडे आणि त्यांच्या पक्षाशी बेईमानी केली मग त्या आमच्याकडे आल्या. त्या जिथे राहतात त्यांनी एक शाखा उभी केली नाही, लोकांना कसे बाजूला ठेवता येईल हे त्यांनी केलं, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

Adv