‘चार टर्म त्यांनी कशा मिळवल्या हे सर्व महाराष्ट्राला माहिती’
“नीलम गोऱ्हे यांनी जे सांगितलं की एका पदासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागायच्या. मला असं वाटतं की महाराष्ट्र विधीमंडळात त्यांना तीन-चार टर्म झाल्या असतील. चार टर्म झाल्या. या सगळ्या चार टर्म त्यांनी कशा मिळवल्या हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांचा एकंदर तिथला सहभाग यावर फारशी चर्चा न केलेली बरी”, असा टोला शरद पवारांनी लगावला.
“त्यांची एन्ट्री जी झाली महाराष्ट्रात विधीमंडळामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षातून झाली. तो कालावधी संपल्यानंतर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. मला आठवत नाही कदाचित काँग्रेस असेल. यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना. हल्ली आता दिसतंय की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत त्या आहेत”, असं शरद पवार म्हणाले.