लोकप्रतिनिधींनाच जिल्हा नियोजन चा निधी मिळेना?

63
Adv

सातारा जिल्ह्याला तीन खासदार लाभले असून दोन लोकसभा व एक राज्यसभेच्या खासदार महोदयांचा समावेश आहे आचारसंहिता डोळ्यासमोर दिसत असून संबंधित लोकप्रतिनिधीची कामे जर आचारसंहितेच्या झाली नाही तर पाच महिने ही कामे वेटिंग वर येणार हे मात्र नक्की

सातारा जिल्हा नियोजन ची बैठक होऊन तीन महिने संपत आले या बैठकीनंतर जिल्ह्यातील आमदार महोदय यांना जिल्हा नियोजन च्या निधीचे वितरण झाले मात्र सातारा माढा व राज्यसभेच्या खासदारांना जिल्हा नियोजन मधून निधीच अजून वितरित झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे दोन खासदार हे महायुतीत असून तर एक खासदार हे महाविकास आघाडीचे आहेत मात्र लोकप्रतिनिधींनाच निधी मिळत नसल्याने मंत्र्यांचा जिल्ह्याला उपयोग तरी काय ? असाच प्रश्न उपस्थित होत आहे

निधी देताना ही राजकारणाचीच एक किनार असल्याचे बोलले जात आहे पालकमंत्री कार्यालयातील सुनील गाडे यांच्याशी संपर्क साधला असता ते फोन उचलत सुद्धा धन्यता मानत नसून जिल्हा नियोजन अधिकारी श्री थोरात साहेब ही फोनची ऍलर्जी आहे का अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे

Adv