शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम

105
Adv

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस दि. ३० मार्च रोजी साजरा केला जाणार असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २९ व दि. ३० या दोन दिवशी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि. २९ रोजी सकाळी ९ वाजता आयएमए हॉल, सातारा येथे रक्तदान शिबीर शुभारंभ, शाहूपुरी येथे नेत्र चिकित्सा शिबीर, दुपारी ४ वाजता मेढा ता. जावली येथे शुभेच्छांचा स्वीकार व भव्य सत्कार समारंभ होणार आहे. रात्री ८ वाजता ढोणे कॉलनी, मंगळवार पेठ येथे महिलांना साड्या व गृहपयोगी वस्तूंचे वाटप, रात्री ९ वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या हॉल येथे जल्लोष महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ११. ३० वाजता शाहू स्टेडियम, सातारा येथे डे- नाईट क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम, त्यानंतर शहरात विविध ठिकाणी केक कापण्याचा कार्यक्रम होणार आहे.

रविवार दि. ३० रोजी (वाढदिनी) सकाळी ८ वाजता पोलीस परेड ग्राउंड येथे मॅरेथॉन स्पर्धा, सकाळी ९ वाजता ना. शिवेंद्रसिंहराजे गारेचा गणपतीचे दर्शन, सकाळी १० वाजता अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना शेंद्रे येथे स्व. भाऊसाहेब महाराज स्मृतिस्थळ येथे अभिवादन तसेच भवानी मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर वळसे ता. सातारा येथील एहसास मतिमंद शाळेमध्ये मिष्टान्न वाटप, गोडोली येथे रक्तदान शिबिराचे उदघाटन, भू विकास बँकेच्या समोर रस्त्याचे उदघाटन, शाहू स्टेडियम येथे महिला क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ, ब्रम्हेन्द्र स्वामी ट्रस्टच्या गाडीचे लोकार्पण, शाहूपुरी येथील गार्डनचे उदघाटन आदी कार्यक्रम होणार आहेत.

सायंकाळी ६ नंतर शुभेच्छा स्विकारणार
रविवार दि. ३० रोजी सायंकाळी ६ नंतर ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले कला व वाणिज्य कॉलेज सातारा (कोटेश्वर मैदानासमोर) येथील मैदानावर सर्वांच्या शुभेच्छांचा स्विकार करणार आहेत. शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते, ना. शिवेंद्रसिंहराजेप्रेमी व नागरिकांनी हार, पुष्पगुच्छ न आणता वह्या किंवा शालोपयोगी साहित्य आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Adv