लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे .पोवई नाक्यावर त्यांचे स्मारक होण्यासाठी आमचा अजिबात विरोध नाही .मात्र या परिसरात ग्रेड सेपरेटर असून या ठिकाणी आठ रस्ते एकत्र येतात या संदर्भातील जिल्हा महामार्ग व राज्य महामार्ग यांच्या तांत्रिक बाबी तपासून पहाव्या लागतील पालकमंत्री शंभूराजे व आमचे जुने संबंध आहेत ते यासंदर्भात चर्चेला येणार असेल तर स्वागतच आहे अशी स्पष्ट भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत मांडली .
तसेच शिवतीर्थ संदर्भात नागरिकांच्या भावना तीव्र आहेत या परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी जे जे करावी लागेल ती नक्की केले जाईल असेही त्यांनी जाहीर केले . खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवतीर्थाच्या संदर्भातील भूमिका पत्रकारांसमोर मांडताना त्यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता त्यांना प्रति टोला लगावला या वादाशी माझा संबंध नसताना ज्यांची उंची नाही, बौद्धिक पात्रता नाही, ज्यांचा अनुभव कमी पडतो अशा लोकांच्या बडबडीकडे काय लक्ष द्यायचे अशी टीकाही त्यांनी केली
खासदार उदयनराजे भोसले पुढे म्हणाले शिवतीर्थाच्या संदर्भात सध्या जी काही चर्चा सुरू आहे त्याच्यावरून पालकमंत्री शंभूराजे व माझ्यामध्ये वाद लावून देण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत .ज्यांची उंची नाही बौद्धिक पात्रता नाही अनुभव त्यांचा कमी आहे असे लोक माझा या प्रकरणाशी संबंध नसताना मी स्वतःच्या विश्वात असल्याची टीका करत आहेत .या बडबडीकडे मी लक्ष देत नाही, माझे विश्व लोकांचे आहे त्यांचाच विचार मी करत असतो कमांड आणि डिमांड यांच्यातील फरक ज्यांना कळत नाहीत त्यांच्याविषयी मी काय बोलायचे . आमच्याकडून लोकांची कामे होतात आणि आदर म्हणून लोक आम्हाला नमस्कार करतात शंभूराज देसाई यांचे वडील शिवाजीराव देसाई व आमचे तीर्थरूप प्रतापसिंहराजे भोसले हे खास मित्र होते शिवतीर्थाच्या संदर्भात शंभूराजे आमच्याकडे चर्चेला येणार असेल तर त्यांचे स्वागत आहे हे घर त्यांचेच आहे . राजकारण आणि समाजकारण यांच्यातील फरक ज्यांना कळत नाही त्यांनी या विषयावर अधिक न बोललेले उत्तम शिवतीर्थ हा ऐतिहासिक परिसर असून या परिसरात पुतळा बसवण्यासाठी तत्कालीन परिस्थितीत एक समिती नेमण्यात आली होती लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते 26 एप्रिल 1962 मध्ये या पुतळ्याचे अनावरण झाले लढाईच्या आवेशातील छत्रपती शिवरायांचा तोफेवर हात ठेवून उभा असलेला पुतळा हा महाराष्ट्रातील एकमेव आहे या संदर्भाने जे सध्या वाद सुरू आहेत यामध्ये भावनिक इशू करण्यापेक्षा प्रत्यक्षात या कामाच्या संदर्भातील तांत्रिक बाबी तपासाव्या लागतील . लोकनेते बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्राचे महान नेते होते राज्याच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे त्यांच्या नावाचे स्मारक होण्यासाठी आमचा बिलकुल विरोध नाही काहीजणांकडून तसे भासवले जात आहे मात्र प्रत्यक्षात तसे नाही पण ज्या ठिकाणी स्मारक उभे करण्याचा आग्रह केला जातोय त्याच्या खाली ग्रेड सेपरेटर आहे . तसेच या परिसरातील काही जागा जिल्हा परिषदेची आहे काही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या मालकीची आहे काही राज्य महामार्ग या परिसरातून जातात रस्ते वाहतुकीचे निकष तत्पूर्वी तपासावे लागतील यासंदर्भात पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तसा रीतसर प्रस्ताव केल्याचे समजले आहे मात्र तो किती व्यवहार्य आहे हे प्रस्ताव आमच्याकडे आल्यानंतर समजेलच शिवतीर्थाचे पावित्र्य जपण्यासाठी जे जे करावे लागेल ते आम्ही सर्व करू असे आश्वासन उदयनराजे यांनी दिले
सातारकरांच्या शिवतीर्थ संदर्भात तीव्र भावना असून लोकनेत्यांच्या स्मारकाला विरोध होत आहे सरकार हे लोकांचे असते लोकांसाठी असते त्यांच्या जनभावना लक्षात घेतला नाही तर उद्रेक होण्याची भीती असते ग्रेड सेपरेटरला लोड बेरिंग आहे त्याला स्मारकाच्या बांधकामाचा बोजा सहन होणार का हेही तपासावे लागेल राज्य महामार्ग 140 व 141 हे या परिसरातून जात असल्याने हे काम किती व्यवहार्यपणे होईल हे सुद्धा पहावे लागेल सातारा सातारा जिल्हा परिषदेच्या जागेची शिवतीर्थ परिसराची मालकी आहे मात्र त्यांच्याकडून कोणतीही देखभाल केली जात नाही प्रत्यक्षात सातारा नगरपालिका देखभाल करत आहे नगरपालिकेकडेच ही जागा हस्तांतरित करावी अशी आम्ही वारंवार मागणी केली आहे विकास कामाच्या कोणत्याही श्रेयवादामध्ये मी पडत नाही आणि इगो हा शब्द माझा डिक्शनरीतच नाही तरीपण इगोचे नाव घेऊन काहीजण माझ्यावर बोलतात हे योग्य नाही साताऱ्यातील सर्व शिवभक्तांचा छत्रपतींवर अधिकार आहे कोणाला वाटत असेल काही कामे माझ्यामुळे झाली तर हरकत नाही काम झाले पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे आमच्यात जुंपून देण्याची काम काही विकृत प्रवृत्ती करतात अशी टीका त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता केली माझा जिल्ह्यात कोणताही शत्रू नाही राजकारणात वारंवार समीकरणे बदलत असतात मी आज पर्यंत कधी फायदा तोटा बघितलेला नाही जीभ दिली म्हणून उचलायची आणि टाळ्याला लावायची प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो अशा शेलक्या शब्दात उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंग राजे यांच्यावर टीका केली शिवतीर्थ तसेच राहावे ही जनभावना आहे स्टेट हायवेच्या निकषात काही गोष्टी बसणार असतील तर स्मारकाला विरोध होण्याचे काहीच कारण नाही साताऱ्यात स्मारक होण्याकरता भरपूर जागा आहेत
शंभूराजे देसाई पत्रकार परिषदेत म्हणाले होते की आमचे सरकार आहे या प्रश्नावर बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले हे जनतेचे सरकार आहे सरकार हा जनतेच्या व्यवस्थेचा भाग असतो मी सुद्धा व्यक्ती म्हणून सरकारचा एक भाग आहे रयतेला डावलून तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही या मुद्द्याशी मी ठाम आहे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारका संदर्भात त्यांनी काय प्रस्ताव केला आहे हे समोर येऊ द्या मग त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते ठरवू असे उदयनराजे यांनी सांगितले सातारा शहराच्या वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी इंदिरानगर पारशी विहीर येथून उंटाचा डोंगर अजिंक्यतारा किल्ला चार भिंती या डोंगरी भागातून रस्ता काढून तो थेट रविवार पेठेला जोडण्याचा प्रस्ताव आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना प्रस्ताव सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडका फडकी बदली करण्यात आली या बदली संदर्भात बोलताना मग ते म्हणाले मर्जी राखणाऱ्यांच्या कामांमध्ये काही अधिकारी प्रयत्न करतात तेव्हा लोकांची कामे होत नाहीत जयवंशी यांची झालेली बदली संशयास्पद आहे सातारा शहरातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भातही बोलताना ते म्हणाले अल्पवयीन मुलांना केवळ बालसुधारगृहात दाखल केले जाते मात्र त्यांच्यावर कोणाचे प्रत्यक्ष नियंत्रण त्यानंतर राहत नाही यासंदर्भात मी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी बोललो आहे जाणीवपूर्वक गुन्हा करणाऱ्या सर्वांना चांगली चुकून काढले पाहिजे आणि अल्पवयीन मुलांच्या संदर्भातील कायद्यामध्ये बदलही केला पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले







