मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा येथील गटाराच्या निकृष्ट कामा प्रकरणी अधिक माहिती घेतली असता सदरील काम हे आमच्या कडे नसल्याचा खुलासा पंचायत समितीचे उच्चअधिकारी श्री खैरमोडे रावसाहेब यांनी सातारानामाशी बोलताना केला आहे
काही दिवसांपूर्वी शिवसेनेने या कामाचा भांडाफोड केला होता आज समक्ष पाहणी केली असता येथील कामनिकृष्ट असल्याचे दिसून आले गेल्या वर्षी हद्दवाढ झाली असून ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ला हा सातारा पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाला आहे तत्पूर्वी या किल्ल्याच्या देखभालीसाठी पंचायत समिती मधून निधी उपलब्ध झाला होता मात्र निधी उपलब्ध होताना फक्त रस्त्याच्या डांबरीकरण यासाठी निधी उपलब्ध झाला होता त्यामध्ये गटार बांधणी याचा उल्लेखच केला नसून नक्की गटाराचे काम करते कोण याचा जावईशोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे
पंचायत समितीचे अधिकारी श्री खैरमोडे यांनी सांगितले की आम्ही सदरील रस्ता हा सातारा पालिकेकडे वर्ग करण्यासाठी प्रस्ताव ठेवला असून तो लवकरच वर्ग होईल तत्पूर्वी हे काम कोण करते याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे
आत्ता सध्याच्या घडीला किल्ले अजिंक्यतारा येथील रस्ता हा पंचायत समितीच्या हद्दीत असून याची सर्वस्व जबाबदारी ही पंचायत समितीची आहे त्यांच्या हद्दीत चाललेल्या कामाची माहिती जर पंचायत समिती नसेल तर तालुक्याचा कारभार कोणाच्या भरोशावर चाललाय हा प्रश्न निर्माण होत आहे