केंद्रातील लोकप्रतिनिधींचे अधिकृत उमेदवार म्हणून शाहूपुरीत दोन उमेदवार उभे आहेत त्यांच उमेदवारांच्या कमळाच्या पाकळ्या छाटण्याचे प्रयत्न सध्या काही लोकप्रतिनिधींकडून होत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे त्यामुळे नावाला पक्षाचे चिन्ह दिले का आणि केंद्रातील लोकप्रतिनिधीन बरोबर किती दगा करणार असा सूर आता शाहूपुरीकरान मध्ये उमटत आहे
शाहूपुरी दोन अधिकृत पक्षाचे उमेदवार उभे आहेत याच उमेदवारांना आता पाडण्यासाठी एक फळी निर्माण झाली असून नक्की या फळीचा सूत्रधार कोण हे पाहणे आता गरजेचे असून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मान कोण खाली घालण्याचा प्रयत्न करते हे शोधणे गरजेचे आहे
या अधिकृत दोन्ही उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शड्डू ठोकून शाहूपुरीच्या आखाड्यात तेल लावलेले पैलवान जरी उतरले असले तरी जनता सुज्ञ आहे योग्य त्या उमेदवारांनाच निवडून देणार असल्याचा ठाम निर्णय येथील जनतेने केला आहे







