कर्नल संतोष महाडिक स्मारकाची झळाळी वाढवणार खा उदयनराजे भोसले

664
Adv

सातारा दिनांक 18 (प्रतिनिधी )

येथील डॉक्टर सुभाषचंद्र बोस चौक परिसरात सातारा नगरपालिकेच्या वतीने शहीद कर्नल संतोष महाडिक स्मारक विकसित करण्यात आले आहे .या स्मारकाच्या परिसरात एकात्मिक सेना मुख्यालय यांच्या वतीने शौर्यवाहन म्हणून टी 55 रणगाडा ठेवला जाणार आहे .पुणे येथील संरक्षण दलाच्या खडकी मुख्यालयाकडून याबाबतचे नुकतेच आदेश प्राप्त झाले याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार द्वारे दिली आहे

जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की मराठा साम्राज्याची राजधानी असणाऱ्या शाहू नगरीला दैदीप्यमान इतिहास व शौर्याची परंपरा आहे . हा जिल्हा सैनिकांचा जिल्हा आहे ,त्यांच्या आदरणीय पराक्रमाला तोड नाही . शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती स्मारक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक परिसरात विकसित करण्यात आले आहे .याच हुतात्मा चौकामध्ये सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून भारतीय सैन्याकडे असलेला t55 हा रणगाडा युद्धवाहन स्मारक म्हणून सातारा नगर परिषदेला उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती . संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्यामुळे पुणे येथील खडकी मुख्यालयाकडून हा युद्ध संरक्षण रणगाडा मंजूर झाला असून तो लवकरच सातारा नगरपालिकेसाठी उपलब्ध होणार आहे . सदर रणगाडा सीएएफडी खडकी येथून सातारा नगर परिषदेने प्राप्त करून घ्यावयाचा आहे या रणगड्याची दैनंदिन देखभाल सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे .

रणगाडा वितरणाचे आदेशपत्र खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना दिले .हुतात्मा स्मारक चौक परिसरात हा t55 रणगाडा बसवला गेल्यानंतर या परिसराला वेगळी झळाळी मिळणार आहे . या कामी नवी दिल्ली येथील सेना भवन, आर्मीचे एकात्मिक मुख्यालय, संरक्षण मंत्रालय तसेच सातारा जिल्ह्यातील आजी माजी सैनिक यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे उदयनराजे यांनी पत्रकात आवर्जून नमूद केले आहे

Adv