खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व प्रसिद्ध व्यवसायिक सागर भोसले आणि त्यांचे सहकारी व जय सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाहूनगर येथील पेरेंट्स असोसिएशन स्कूलच्या प्रांगणात होम मिनिस्टर कार्यक्रम रंगणार आहे जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून साताऱ्यातील मान्यवर महिलांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाची माहिती जय सोशल फाउंडेशनच्या अधिकृत सूत्रांनी दिली
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून देव माणूस फेम अभिनेते किरण गायकवाड आणि तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया देवधर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी महिलांसाठी विविध फनी गेम्स चे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये रिंग कॉम्पिटिशन तळ्यात मळ्यात आणि इतर विविध स्पर्धा होणार आहेत . विजेत्या महिलांना आर ओ वॉटर प्युरिफायर ,गॅस शेगडी, वाशिंग मशीन, अशी विविध बक्षिसे दिली जाणार आहेत
सातारा शहराच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रात सक्रियपणे काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सत्कार केला जाणार आहे गेल्या दोन वर्षात करोना करोना संक्रमणामुळे शाहूनगर भागामध्ये कोणताही सामूहिक कार्यक्रम घेता आला नव्हता सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करूनच हा कार्यक्रम पार पाडला जाईल अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सागर भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली