शाहूपुरी हद्दीतील गुटखा गांजा प्रकरणी शाहूपुरी पोलीसांनी शाहूपुरी हद्दीतील पान टपऱ्या तपासणी सुरू केली असून याप्रकरणी क डक कारवाई करणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संत्रे यांनी दिली
पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली असून याप्रकरणी अन्न औषध विभाग मात्र सुस्त असून साताऱ्यातील अन्न औषध विभागालाच औषधांची गरज असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे
सातारा शहरात गांजा व गुटख्याची अवैद्य विक्री होतअसल्याची माहिती पोलिसांना मिळाली असल्याने याप्रकरणी सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ॲक्शन मोडवर आल्याने बरेच जणांचे धाबे दणाणले आहेत साताऱ्यातील युवा पिढी या व्यसनाच्या आधीन होऊ नये हाच मूळ उद्देश असून याप्रकरणी कोणत्याही पान टपरीत गुटखा गांजा सापडल्यास संबंधित दुकानदारावर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले
सातारा शहरात गुटखा गांजाची तस्करी होत असल्याची पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली असल्याने ही मोहीम अधिक तीव्र करणार असल्याची माहिती ही शाहूपुरी व सातारा शहर पोलिसांनी दिली