सातारा शहराच्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर अस्तित्वात असणा-या गुरुवार परजयेथील जुन्या शॉपिंगसेंटरचे बाजुच्या ठिकाणी सुसज्य आणि अदयावत शॉपिंग सेंटर उभारणेचा नगरपरिषदेचा प्रस्तावास शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधुन मंजूरी दिली आहे त्याकरीता 10 कोटी रुपयांचा निधी देखिल प्राप्त झाला आहे. शहराच्यामध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येणा-या या तीन मजली नवीन व्यापारी वास्तुमुळे,शहरातील व्यापार उदिमाला चालना मिळण्या बरोबरच सातारच्या वैभवात भर पडणार आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
सातारा नगरपरिषदेच्या गुरुवार परज या नावाने ओळखल्या जाणा-या मोकळया जागेत पूर्वी मोठा बाजार भरत असे. नगरपरिषदेच्या प्रशासकीय राजवटी दरम्यान याठिकाणी सुमारे 40 वर्षापूर्वी नगरपरिषदेने शॉपिंग सेंटर उभारलेले आहे.त्या वेळच्या धोरणानुसार उभारण्यात आलेल्या या वास्तु मधील गाळयांचा व्यापारी उपयोग होण्याबरोबरच नगरपरिषदेची शाळा
भरत आहे. तसेच मुबलक मोकळी जागा शिल्लक आहे.या ठिकाणी जुन्या शॉपिंग सेटरच्या बाजुला अदयावत व परिपूर्ण आराखडा तयार करुन, नवीन शॉपिंग सेंटर उभारण्याचा प्रस्ताव सातारा विकास आघाडीच्या सुचनेवरुन नगरपरिषदेने नगरविकास विभागाला सादर केला होता.याबाबत मुख्यमंत्री तथानगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांना आम्ही विनंती केली असता,त्यांनी सकारात्मकतेने आणिसंवेदन शीलतेने वैशिष्टयपूर्ण योजनेमधुन प्रस्ताव मंजूर करताना, 10 कोटी रुपयांचा भरीव निधी देखिल मंजूर केला आहे.
या नवीन शॉपिंगसेंटरची उभारणी करताना,नगरपरिषदेच्या जागेचा पूरेपूर उपयोग सामान्य नागरीक,व्यापारीयांना होण्या करीता विशेष लक्ष पुरवलेले आहे. तीन मजली इमारतीमध्ये व्यापारी गाळे,प्रशस्त पार्किंग,आणि ऑफिसेसकरीता जागा
उपलब्ध होणार आहे.सातारचा गुरुवार परज हा परिसर जास्त लोकसंख्या घनतेचा आणि नेहमीच वदळींचा परिसर म्हणून ओळखला जातो. याठिकाणी मोठी वास्तु सुविधांसह उभारणी झाल्यावर या परिसराचा अमुलाग्र बदल होणार आहे. राज्याचे उप मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, मुख्य मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची साता-याबद्दलचा जिव्हाळा पुन्हा एकदा दिसून आले आहे.तसेच पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.सातारा शहरात कोटयावधींची कामे प्रामुख्याने केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त करुन होत आहेत.नगरपरिषदे वर फारसा आर्थिक ताण न येता नागरीकांना सर्व सुविधा देण्याचा व्यक्तीगत आमचा आणि सातारा विकासआघाडीचा प्रयत्न नेहमीच राहीला आहे.आमच्या प्रयत्नांचा लाभ सर्व सातारकर नागरीकांना होत असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.