पालिकेत पाणी मागणी केली असता अधिकाऱ्यांनी अरे रवी व उद्धट भाषा वापरली यामुळे गोडोलीत निषेध सभेचे आयोजन केले असल्याची माहिती नगरविकास आघाडीचे माजी नगरसेवक शेखर मोरे पाटील यांनी सोशल मीडिया द्वारे दिली
काय दिला मोरे पाटील यांनी संदेश पहा
👇🏻
प्रभाग क्रमांक पाच गोडोली मधील सर्व नागरिकांना व विशेषत महिलांना नम्र निवेदन आहे की काल एमजीपी ची लाईन फुटली होती त्या संदर्भात पाणीपुरवठा आपल्या गोडोलीला दोन दिवस झाला नाही. काल सकाळपासूनच बरेच फोन मला महिलांचे फोन आले पाण्याची व्यवस्था करा म्हणून. त्यासंदर्भात मी आपली मातृसंस्था सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला. गोडोली गावात व परिसरात पाणीपुरवठा करण्यासंदर्भात टँकर बुकिंग केले. साडेबारा वाजेपर्यंत पण गोडोली गावात पाणीपुरवठा नगरपालिकेतर्फे होऊ शकला नाही म्हणून मी संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली असता मला आरे रावी ची उत्तर देण्यात आली. नगरपालिकेचा आणि गोडोली चा काय संबंध. आम्ही तुम्हाला पाणीपुरवठा करू शकत नाही एमजीपीच्या कार्यालयात जावा आपण संबंधित नगरपालिकेला टॅक्स भरतो. मूलभूत हक्क वीज पाणी आरोग्य हे नगरपालिकेचे काम आहे आपल्याला नागरिकांना सुविधा पुरवण्याचे हे अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून हेतूपुरस्पर काही नगरसेवकांना वाईट वागणूक देतात त्यांची कामे रखडवतात. आशा अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी उद्या सकाळी दहा वाजता. सकाळी भैरवनाथ मंदिर येथे निषेध सभा आयोजित केली आहे. तरी यास निषेध सभेला गोडोली गावातील व कामठीपुरा बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहून. सहकार्य करावे







