चार मंत्र्यांच्या जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाचा गणेश मंडळांना कोलदांडा

40
Adv

सातारा जिल्ह्यात सध्या चार मंत्री असून गणेश मंडळाच्या झालेल्या बैठकीत उपजिल्हाधिकारी मलिकार्जुन माने व जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी सांगितले होते की एक खिडकी योजना आम्ही सुरू करतो मात्र गणेशोत्सवाच्या आगमनाला अवघे तेरा दिवस राहिले असताना सातारा नगरपरिषद वगळता बाकीच्या प्रशासनाने गणेश मंडळांना कोल दांडा दिला असल्याचे दिसून येते

जिल्हा प्रशासन व गणेश मंडळांची 30 जुलै रोजी एक बैठक संपन्न झाली होती त्या बैठकीमध्ये जिल्हा प्रशासनाने काही गणेश मंडळाच्या मागणी मान्य केले होत्या त्यामध्ये प्रामुख्याने मागणी होती ती एक खिडकी योजना त्याला प्रशासनाने सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर यावर्षीपासून एक खिडकी योजना सुरू असे जाहीर केले होते मात्र आजपर्यंत तरी सातारा नगरपरिषद वगळता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ सहाय्यक धर्मादाय आयुक्त व पोलीस प्रशासन यांची सांगड नसल्याने जिल्हा प्रशासनाने गणेश मंडळांना दिलेले आश्वासन हवेत विरले असल्याने गणेश मंडळ प्रशासनावर तीव्र नाराज झाले आहेत

एखादी कारवाई करायची असेल तर पोलीस प्रशासन तत्परतेने कारवाई करते मात्र गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी मनुष्यबळ देण्यास कमी पडत असल्याने पोलीस प्रशासनावर गणेश मंडळाची नाराजी दिसून येते सातारा जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्री असून ही गणेश मंडळाची अवस्था असेल तर राज्य सरकारने गणेशोत्सव म्हणून दर्जा दिलेल्या या सणाला अर्थ काय अशी विचारणा गणेश मंडळ करत आहेत

Adv