466 कोटीच्या अंदाजपत्रकाला पालिकेचा हिरवा कंदील

234
Adv

भरीव विकास कामांचा समावेश असलेले सातारा पालिकेचे 466 कोटी 33 लाख 84 हजार 300 रुपयांचे जम्बो बजेट प्रशासकीय सभेत मंगळवारी मंजूर करण्यात आले. पालिकेच्या गंगाजळीत यंदाच्या आर्थिक वर्षात तीन लाख 88 हजार 300 रुपयांची श्रीशिल्लक दाखवण्यात आली आहे पालिकेला महसुली जमा खर्च आणि भांडवली जमा खर्च यांचा ताळमेळ बसवताना बरीच कसरत करावी लागली आहे

यंदाच्या बजेटमध्ये पुढील वर्षी दहा टक्के लोक वर्गणी देणे करिता विविध प्रकल्पांसाठी 40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात प्रशासक अभिजीत बापट यांच्या अध्यक्षतेखाली हे बजेट सादर करण्यात आले अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, मुख्य अभियंता दिलीप चिद्गे, मुख्य लेखापाल आरती नांगरे, सहायक लेखापाल हिम्मतराव पाटील, लेखा विभागाचे वरिष्ठ लिपिक भालचंद्र डोंबे तसेच सातारा पालिकेचे सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते

पालिकेच्या सुधारित बजेटचे वाचन भालचंद्र डोंबे यांनी केले 2023- 24 या बजेटमध्ये उत्पन्नांच्या बाजूचा विचार करता मालमत्ता कर 21 कोटी रुपये,पाणी कर सहा कोटी रुपये, विशेष स्वच्छता कर एक कोटी 75 लाख, अग्निशमन कर तीस लाख, इमारत भाडे व खुल्या जागा भाडे दीड कोटी, हातगाडा परवाना फी 30 लाख, नाट्यगृह भाडे पाच लाख,विकास कर साडेतीन कोटी, प्रीमियम चार कोटी, मंडई फी 12 लाख, महसुली अनुदाने 48 कोटी 13 लाख 50 हजार व भांडवली अनुदाने 138 कोटी 88 लाख दहा हजार अशा उत्पन्नाच्या ठळक बाबी नोंदविण्यात आल्या आहेत

खर्चाच्या बाबी सुद्धा निर्देशित करण्यात आल्या आहेत . कर्मचारी वेतन भत्ते 27 कोटी 40 लाख, निवृत्ती वेतन 16 कोटी, सातवा वेतन आयोग फरक दोन कोटी चाळीस लाख, कार्यालयीन प्रशासकीय खर्च 13 कोटी 21 लाख 15 हजार, मत्तांची दुरुस्ती 10 कोटी 18 लाख,शिक्षण मंडळ अंशदान साडेतीन कोटी, शासकीय कर्ज परतफेड दोन कोटी 30 लाख, पाणीपुरवठा विषयक सोयी दोन कोटी ५५ लाख, निवडणूक खर्च एक कोटी सत्तर लाख, थोर व्यक्ती जयंती वर्धापन दिन 15 लाख, पर्यावरण संतुलन 50 लाख, 5% दिव्यांग कल्याणकारी योजना 40 लाख, मागासवर्गीय कल्याण निधी 40 लाख, महिला बालकल्याण निधी 40 लाख या ठळक बाबींचा खर्चात समावेश आहे

भांडवली विकास कामांसाठी विचार करता नगरपरिषद प्रशासकी इमारतीसाठी 30 कोटी, हद्दवाढ क्षेत्र विकास योजना 35 कोटी,अधिसूचित नागरी सेवा व सुविधा मजबुतीकरण दहा कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजना दहा कोटी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना 17 कोटी, दलितेतर योजना 11 कोटी 50 लाख , पोवई नाका येथे शिवतीर्थ विकसित करणे आठ कोटी व अमृत योजनेअंतर्गत गोडोली तळे विकसन कास धरण नवीन पाईपलाईन व पाणीपुरवठा योजना स्वयंचलन 58 कोटी, अशा भरीव विकास कामांच्या खर्चाचा समावेश आहे

पालिकेचे 2023 24 चे एकूण संकीर्ण बजेट 466 कोटी 33 लाख 84 हजार 300 रुपये असून त्याला प्रशासकीय सभेत मंजुरी घेण्यात आली हे बजेट जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मंजुरीसाठी पुढील आठवड्यात पाठवण्यात येणार आहे

रुपया असा येणार नगरपरिषद

दर व कर 10 रू
महसुली अनुदान 15 रु
भांडवली अनुदान 50 रु
नगरपरिषद मालमत्ता फी-4 रु
व्याज विलंब आकार -2 रुपये
इतर उत्पन्न संकीर्ण- 1 रुपये
ठेवी डिपॉझिट -12 रुपये
कर्ज सहा रुपये एकूण 100

रुपया असा खर्च होणार

आस्थापना व प्रशासकीय खर्च 14 रुपये
मतांची दुरुस्ती व देखभाल 2 रूपये
व्यवहारा करता खरेदी 2 रूपये
दिलेली अंशदाने व अनुदाने- 1रूपये
विकास कामे- 72 रुपये
संकीर्ण खर्च 1रूपये
असाधारण खर्च 8 रुपये
एकूण 100

Adv