इश्रम कार्ड नोंदणी मोहीम उपक्रम कौतुकास्पद श्री छ उदयनराजे

362
Adv

सातारा येथील यादोगोपाळ पेठेत श्रम मंत्रालय भारत सरकार पोस्ट ऑफिस सातारा व माजी उपनगराध्यक्ष सौ दिपाली राजू गोडसे यांच्या संयुक्त विद्यमाने 7 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत श्रम मंत्रालय द्वारा असंघटित कामगारांच्या साठी श्रम कार्ड नोंदणी चालू होती त्याचे वितरण करताना वरील उद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले यावेळी युवा नेते संग्राम बर्गे बाजार समितीचे संचालक काका धुमाळ सामाजिक कार्यकर्ते राजीव गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत योजनेच्या पश्चिम महाराष्ट्रा च्या अध्यक्ष व सातारा विकास आघाडी च्या माजी उपनगराध्यक्ष सौ दिपाली राजू गोडसे यांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जात असतात गेली पंधरा दिवस राबवलेल्या या उपक्रमात 24 प्रकारच्या असंघटित कामगारांना दोन लाखांचा विमा व दरवर्षी वैद्यकीय खर्चासाठी श्रमा मंत्रालयाकडून मदत म्हणून एक लाख रुपये या श्रम कार्ड च्या माध्यमातून मिळणार आहेत त्यांनी राबविलेला हा उपक्रम समाजातील तळागाळातील महिला व पुरुष यांच्यासाठी अत्यंत उपयोगी असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले

Adv