सातारा जिल्हा नियोजन समितीमधुन विविध तालुक्यातील विकास कामे प्रस्तावित केली होती. त्यापैकी एकूण रुपये २४ कोटी रुपयांची सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील विविध विकास कामे कामे मंजूर करण्यात आली आहेत अशी माहिती खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे .
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन जिल्हयातील विकास कामांचा आराखडा तयार करण्यात येत असतो.या आराखड्यास राज्यशासनाकडून मंजूरी मिळाल्यावर आराखड्यातील एकूण रक्कमेची कामे मार्गी लागतात.
जिल्हा नियोजन समितीमध्ये आम्ही स्वतः सदस्य आहोत. नियोजन समितीचा सदस्य आणि संसदेचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातारा जिल्हयातील विविध तालुक्यातील नियोजन समितीमधुन होणारी विकास कामे प्रस्तावित केली होती. सदर कामांपैकी एकूण सुमारे २४ कोटी रुपयांची खालील प्रमाणे तालुकानिहाय विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत.
या विकास कामांत विविध गावपातळीवरील रस्ते, गटर्स, समाजमंदिरे, स्मशानभुमी संदर्भातील रस्ते, प्रतिक्षा शेड, आदी विकास कामांचा समावेश आहे. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रीया आहे. सर्वसामान्यांच्या विकासाकरीता,राज्यासह प्रामुख्याने केंद्राच्या निधीचा सुयोग्य उपयोग करुन घेवून, विकास साधण्याचा आमचा प्रयत्न राहीला आहे.
यामध्ये सामान्य ग्रामस्थ हाच केंद्रबिंदू मानुन, राजकारण बिरहित समाजोपयोगी विकास कामे मार्गी लावण्यासाठी आमचे अखंड प्रयत्न आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्हा नियोजन समितीमधुन सुमारे २४ कोटींपेक्षा जास्त विकास कामे प्रस्तावित करण्यात आली होती. प्रस्तावित कामांपैकी, जवळजवळ सर्व विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. याकामी सन्माननीय पालकमंत्री, नियोजन समितीचे सर्व सदस्य आणि संबंधीत अधिकारी यांचे सहकार्य लाभले असे पत्रकात शेवटी नमूद करण्यात आले आहे