कालकाजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अतिशी यांनी यापूर्वी सप्टेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. या निर्णयाची पुष्टी करताना आप नेते गोपाल राय यांनी एएनआयला सांगितले
की, “आजच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत, अतिशी दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करतील असा एकमताने निर्णय घेण्यात आला. आव्हानात्मक काळात, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून दिल्लीतील लोकांसाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आप एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका पार पाडेल.”