
सातारा येथील पोस्ट ऑफिस सातारा जिल्हा व माजी उपनगराध्यक्ष सौ दिपाली राजू गोडसे यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथील यादोगोपाळ पेठेत असंघटीत महिला व पुरुष कामगारांसाठी डाक घर भारत विभाग श्रम मंत्रालय केंद्र सरकार व प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत समाजातील 24 प्रकारच्या असंघटित कामगारांसाठी श्रम कार्ड विशेष नोंदणी सप्ताह सुरू करण्यात आला आहे सात फेब्रुवारी रोजी यादोगोपाळ पेठेतील सातारा जिल्हा बाल विकास समिती येथे या योजनेचा शुभारंभ सातारा जिल्हा पोस्ट ऑफिस च्या प्रमुख अपराजिता मिथा सातारा शहर पोस्ट ऑफिस प्रमुख सविता दळवी पोस्ट विभागाचे माने साहेब बिचकर साहेब दीपा ढवळे माजी उपनगराध्यक्ष सौ दिपाली राजू गोडसे यांच्या हस्ते करण्यात आलायावेळी बोलताना अपराजिता मिथा असंघटित कामगारांसाठी सौ दिपाली राजू बोरसे यांनी पुढाकार घेऊन ही योजना एकाच ठिकाणी चालू केली याचा लाभ समाजात काम करणाऱ्या 24 प्रकारच्या असंघटित कामगारांना होणार असून 7 फेब्रुवारी पासून भारतातील प्रत्येक पोस्ट ऑफिस मध्ये ही योजना चालू करण्यात आली आहे तसेच या कार्ड च्या माध्यमातून कार्ड नोंद नोंदणी झाल्यानंतर सरकार तर्फे देण्यात येणाऱ्या सर्व योजना थेट असंघटित कामगारांना मिळणार आहेत दीपाली गोडसे यांनी राबवलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे
सातारा शहर पोस्ट ऑफिस च्या प्रमुख सविता दळवी या वेळी बोलताना म्हणाल्या श्रमण कार्डच्या माध्यमातून असंघटीत महिला पुरुष कामगारांना दोन लाख रुपये चा विमा अपघात अथवा इतर वैद्यकीय उपचारासाठी एक लाख रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहेत ही योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी सातारा शहराबरोबरच सौ दिपाली गोडसे यांनी सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा उपक्रम राबवण्याचे ठरवले असून त्यांचा हा निर्णय नक्कीच असंघटित कामगारांसाठी फायद्याचा ठरेल असा विश्वास व्यक्त केला
यावेळी बोलताना दीपाली गोडसे म्हणाल्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत असून दिनांक 7 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या दरम्यान विविध प्रकारचे शासनाचे उपक्रम थेट सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे तसेच महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून याचाही लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले श्री राजू गोडसे यांनी प्रास्ताविक केले
राजेश कानिम यांनी आभार मानलेकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सप्त तारामंडळ सप्त तारा महिला बचत गट भारती भोसले मयुरी कुडाळकर गौरव पवार सातारा शहर पोस्ट ऑफिस मधील अनेक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले विशेष सहकार्य सातारा जिल्हा बाल विकास समितीचे लाभले
यावेळी नागरिकांना अल्पदरात आधार कार्ड लिंक करून दिले जाणार आहे







