जिल्हा बँक राज्यात नव्हे तर देशातच अव्वल चेअरमन नितीन पाटील यांची माहिती

1476
Adv

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक सदस्य यांची कार्यशाळा महाबळेश्वर येथे संपन्न झाली.महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील,बँकेचे अध्यक्ष मा. श्री. नितीन जाधव(पाटील), उपाध्यक्ष अनिल देसाई, बँकेचे संचालक मा .आ मकरंद जाधव (पाटील) व मा .संचालक सदस्य, तसेच श्री. रावत, मुख्य सरव्यवस्थापक, नाबार्ड प्रादेशिक कार्यालय, पुणे सहकार आयुक्त व निबंधक,सहकारी संस्था,पुणे,विद्याधर अनास्कर,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँ सुबोध अभ्यंकर.नाबार्ड सातारा डीडीएम,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यशाळेची सुरूवात करणेत आली.
याप्रसंगी रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, ग्रामीण अर्थव्यवस्था विकसीत करणेत सहकारी बँकांचा मोलाचा वाटा आहे. आरबीआय, नाबार्ड, शासनाचे सर्व मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज करीत आहे. सहकारी बँकांमध्ये व्यवसायिकतेचे प्रमाण वाढत असून भविष्यात त्यामध्ये अधिक व्यवसायिकता येईल हे निश्चित आहे . या बँकेची कर्ज वुसली चांगली आहे, एनपीए कमी आहे. साखर कारखान्यांचा कर्जपुरवठा कमी होत असलेमुळे जिल्हा बँकांनी यापुढे उद्योग व्यवसायासाठी अधिक कर्जपुरवठा करणे आवश्यक आहे. राज्याचे सहकार खात्याने सहकारी बँकांचे प्रश्न, अडचणी आरबीआय/ नाबार्ड/केंद्र शासनाला कळविल्या पाहिजेत. ग्रामीण भागाचा विकास सहकारामुळे झाला आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. सहकारी बँकांची तुलना सार्वजनिक व खाजगी बँकांशी करणे चुकीचे आहे. त्यामुळे, सहकार टिकला पाहिजे व वाढला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सातारा जिल्हा बँक सर्व नियमांचे पालन करुन कामकाज करते म्हणूनच राज्यातच नव्हेतर देशात अग्रगण्य आहे. या कार्यशाळेकरिता सहकारी बँकिंग मधील तज्ञ व नाबार्डचे अधिकारी यांनी केलेले मार्गदर्शन सातारा जिल्हा बँकेचे कामकाज अधिक प्रभावी करणेस मार्गदर्शक ठरणार असलेचे सांगितले.
ना. श्री. बाळासाहेब पाटील म्हणाले, बँकेचे नुतन संचालक मंडळास बँकेचे कामकाजाची माहिती असणे आवश्यक असून यासाठी कार्यशाळा आयोजित केली आहे ही चांगली बाब आहे. काळानुरुप कामकाजात बदल किंवा सुधारणा करणे आवश्यक आहे तरच आपण स्पर्धेत टिकणार आहोत. सहकार कायदा १९०४ साली अस्तित्वात आला असून यामध्ये वेळोवेळी बदल झाले असून ते आवश्यक होते. यशवंतराव चव्हाण, आर .डी .पाटील, बाळासाहेब देसाई, किसन वीर इत्यादी नेत्यांनी सर्वसामान्यांचे हित डोळयासमोर ठेवून बँकेची स्थापना केली आहे. या बँकेत राजकारण आणले जात नाही म्हणून बँकेची वाटचाल चांगली आहे . शेतक-यांसाठी नवनवीन योजना आखत आहे. त्यांचे शेती तसेच शेती पूरक उत्पन्न वाढीसाठी वित्तपुरवठा करीत आहे. बँकिंग कामकाजाबरोबरच दुष्काळ, अतिवृष्ठी किंवा अलिकडेच कोविड-19 चे महामारीत बँकेने आर्थिक मदत, गोरगरीब व मोल मजुरी करणाऱ्या व्यक्तींना अन्नधान्याचे किट व कोविड बाधित रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयांना वैद्यकीय यंत्रसामुग्री उपलब्ध करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे .
नवनिर्वाचित संचालक सदस्यांना संबोधित करताना श्री. रावत म्हणाले, महाराष्ट्रात नव्हेतर संपूर्ण देशातील सहकारी बँकिंग क्षेत्रात एक आदर्श, नावलौकिक प्राप्त बँकेचे संचालक सदस्य आहात ही अभिमानाची बाब आहे. बँकेने चांगला मापदंड वाढविला असून ही बँक सहकारी बँकिंग क्षेत्रात पुढे जाईल यात संदेह नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे या बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असून आधुनिक बँकिंगच्या सर्व सेवा जलद व प्रभावी देणारी देशातील एक सशक्त व प्रगत बँक आहे. सतत ऑडीट वर्ग ‘अ’ व वसुली 99 टक्के प्रमाण राखणे ही अत्यंत चांगली बाब असून देशात इतर सहकारी बँकांच्या तुलनेत या बँकेचे कामकाज खूपच चांगले आहे. ‘शून्य’ टक्के नेट एनपीए प्रमाण सातत्याने ठेवणे हे अत्यंत कठीण काम असून याचे श्रेय संचालक सदस्य व व्यवस्थापनाला जाते .ज्या ज्या ठिकाणी सहकारी बँकांचे कामकाज व व्यवसाय चांगला आहे त्या ठिकाणी संचालक मंडळ चांगले निर्णय घेत असल्याचे व सहकार्य असल्याचे दिसून आले आहे . यावेळी श्री. रावत यांनी संचालक मंडळाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

डॉ. राजेंद्र सरकाळे प्रास्ताविक करताना म्हणाले, बँकेने ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. बँकेचा एकूण मिश्र व्यवसाय जवळपास १४००० कोटी आहे . बँक स्थापनेपासून सतत नफ्यात असून ऑडीट ‘अ’ वर्ग मिळाला आहे. बँकेचा निव्वळ एनपीए सतत १४ वर्षे शून्य टक्के राखणेत यश मिळाले आहे. बँकेच्या इतिहासात मागील वर्षी १५० कोटीचा विक्रमी नफा झाला आहे . बँकेला नाबार्ड मार्फत उत्कृष्ठ कार्यक्षमता पुरस्कार मिळाला आहे. बँक नफ्यातून प्रतिवर्षी विकास संस्थांसाठी आर्थिक तरतूद करीत असून या रकमेतून विकास संस्थांनी शेअर्स खरेदी केलेमुळे त्यांचे भाग भांडवलात वाढ होवून संस्था सक्षम होण्यास मदत झाली आहे . सर्व शाखा नफयात आहेत . पॅक्स अॅज मॅक्स योजनेमध्ये विकास संस्थांची निवड केली असून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत . बँकेने शेतकरी सभासदांना मोठया प्रमाणावर अल्प मुदत पीक कर्जवाटप केलेले आहे, परंतू शासनाकडून व्याज परतावा रक्कम वेळेत मिळणेसाठी नाबार्डने प्रयत्न करावेत . नाबार्डचे अध्यक्ष डॉ. चिंताला यांनी जिल्हा बँकेस दिलेल्या भेटीप्रसंगी अपेक्षा केलेप्रमाणे बँकेचा एकूण व्यवसाय २०००० कोटी होणेसाठी प्रयत्न सुरु आहेत . बँकेला गुंतवणूकीपासून चांगले उत्पन्न मिळत आहे .

Adv