राज्यातील लोकप्रिय खासदार,क्रीडा क्षेत्रावर विशेष प्रेम असणारे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली, उदयनराजे मित्रमंडळाच्या वतीने, येत्या १ फेब्रुवारी २०२३ पासून,शाहु स्टेडियम,सातारा येथे श्रीमंत छत्रपतीप्रतापसिंहराजे भोसले ऊर्फ दादामहाराज स्मृती दिवस-रात्रटेनिस बॉलक्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती श्री छ उदयनराजे भोसले मित्र मंडळ साताराचे वतीने डे-नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धाचे संयोजक श्री अमोल पाटुकले यांनी दिली.
साता-यामध्ये गेल्या 17 वर्षापेक्षा जास्त काळापासून शाहु स्टेडीयम येथे टेनिस चेंडुवरील डे-नाईट क्रीकेट स्पर्धा अतिशय उत्साहात आणि जास्तीत जास्त क्रीकेट संघांच्या सहभागाने होत आहे.खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रेरणेने सातारा शहरात दिवस-रात्र टेनिस क्रीकेट स्पर्धा सर्वप्रथमसुरुवात उदयनराजे भोसले मित्रमंडळाच्या मार्फत झाली आहे. स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट नियोजनआंतर्राष्ट्रीय क्रीकेट नियमावलीनुसार आयोजन, स्पर्धेचे समालोचन,सुयोग्य प्रखर प्रकाश व्यवस्थाही या स्पर्धेची
वैशिष्टे आहेत.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खा श्री छउदयनराजे भोसले हे नेहमी आग्रही असतात स्पर्धापूर्व नियोजन आणि स्पर्धा कालावधीतील सर्व व्यवस्था याकरीता खासदारश्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मोलाचे भरीव सहकार्य असते. तसेच स्पर्धेच्या सुरुवातीपासून दरवर्षीच्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी जेष्ठ क्रीडा संघटक सुरेश साधले व सातारा जिल्हा क्रिकेट असोसिऐशनचे सचिव श्री.इर्शाद बागवान यांचेसह अनेक क्रीकेटप्रेमींचे सहकार्य लाभलेले आहे.या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांना भव्य करंडकासह प्रथम क्रमांकाच्या विजयी संघाला रोख रु.१,००,००१/- व द्वितीय क्रमांकाच्या संघाला रोख रु. ७५,००१/- व तृतीय क्रमांकाच्या संघाला रोख रु.५०,००१/- चे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेतील सर्व संघातील खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.स्पर्धा जास्त लांबु नये आणि स्पर्धेचे नियोजन सुयोग्य होण्यासाठी, स्पर्धेत भाग घेणा-या संघांचेप्रवेश मर्यादित ठेवणेत येणार आहेत.इच्छूक संघांनी दिनांक२१जानेवारी २०२३ पूर्वी श्रीअमोल पाटुकले, साखरगड प्राईड,बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातारा, शाहु स्टेडियम जवळील ज्योती स्पोर्टस्,ज्योती स्पोर्ट्स – 9822498490 अथवा नगरपरिषदेचे केसरकर पेठ येथील शॉपिंग सेंन्टर मधील मार्शल स्पोर्टस्,मार्शल स्पोर्ट्स – 9765700049 शॉप नं. १६,सातारा या ठिकाणी संपर्क साधुन, आपल्या संघांचे प्रवेश आणि स्पर्धेच्या अटीशर्ती यांची अधिक माहीती घ्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.