केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे सातारा दौऱ्यावर आले असता त्यांचा खा श्री छ उदयनराजे भोसले मित्र समूहाच्यावतीने काका धुमाळ भारतीय मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे,माजी नगरसेवक सागर साळुंखे गणेश जाधव किशोर गालफाडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला
यावेळी छ उदयनराजे भोसले समर्थक व युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्रामजी बर्गे यांची भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रामदासजी आठवले यांच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले जबाबदार खांद्यावर मोठी जबाबदारी दिली गेल्याबद्दल आठवले यांनी बर्गे यांची पाठ थोपटली आणि त्यांच्या कार्याची कौतुक केले खा उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्व शैलित तयार झालेले नवीन युवा नेतृत्व म्हणजे विलासपूरचे संग्राम बर्गे हे होय त्यांच्या कार्याची चुणूक दिसून आल्याने प्रदेश कार्यकारिणीने त्यांना युवा मोर्चा राज्य उपाध्यक्ष पदावर कामाची संधी दिली आहे बर्गे यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या उपक्रमातून आपल्या कामाचा झपाटा दाखवून दिला आहे प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर पहिल्यांदाच छ उदयनराजे भोसले मित्र समहूच्यावतीने रविवारी पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेण्यात आली. मित्र समूहाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच संग्राम बर्गे युवा मोर्चाच्या आघाडीवर काम करण्याची मोठी संधी मिळाल्याने आठवले यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आणि त्यांची विशेषत्वाने पाठ थोपटली युवा नेतृत्व हे रचनात्मक आणि धडक कामासाठी प्रसिद्ध असते ती गुणवत्ता संग्राम बर्गे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे रचनात्मक आणि विकासात्मक कामांमध्ये संग्राम बर्गे यांनी आपले नाव मिळवले आहे त्यामुळे प्रदेश कार्यकारणीवर सुद्धा त्यांच्याकडून विशेष कामगिरी नोंदवली जाईल अशी अपेक्षा रामदासजी आठवले यांनी व्यक्त केली. यावेळी काका धुमाळ माजी नगरसेवक सागर साळुंखे गणेश जाधव इत्यादी उपस्थित होते






