बंदुकीचा धाक दाखवून वीस हजाराची खंडणी

368
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

बंदुकीचा धाक दाखवून एकाला २0 हजार रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला. ही घटना दि. २ रोजी दुपारी दीड वाजता नेले किडगाव, ता. सातारा येथे घडली. यश सुभाष साळुंखे (रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ अशोक साळुंखे (वय ३१, रा. नेले, किडगाव, ता. सातारा) याचा चुलत भाऊ यश साळुंखे हा त्याच्या घरी आला. बंदुकीचा धाक दाखवून सोमनाथ याच्याकडे त्याने २० हजार रुपये मागितले. हे पैसे न दिल्याने सोमनाथ याला जिवे मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने सोबत चालत घेऊन तो जात होता. याचवेळी तेथे पोलिस पोहोचल्याने त्याचा डाव फसला आणि पोलिसांनी त्याला पकडले. या घटनेची सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक एस.ए. काटकर करीत आहेत.

Adv