आदमापूर जिल्हा कोल्हापूर चे प्रसिद्ध संत बाळूमामांची पालखी गेल्या दोन दिवसापासून सातारा शहरांमध्ये वास्तव्याला आहे या पालखीचे साताऱ्यातून प्रस्थान होताना जलमंदिर येथे खासदार छ उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो सातारकरांनी बाळूमामाच्या पालखीचे दर्शन घेऊन बाळूमामाच्या नावाने चांगभलं म्हणत भंडारा उधळला
बाळूमामा हे 19 व्या शतकातले प्रसिद्ध संत होते त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथील अकोळ येथे झाला आणि त्यांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे आहे बाळूमामा ने केलेल्या चमत्कारिक घटनांच्या आख्यायिका आजही सांगितल्या जातात बाळूमामांची मेंढरे आणि त्यांची पालखी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमंती करत असते गुढीपाडव्याला या भंडार्याची आदमापूर येथे सांगता होते
बाळूमामांची पालखी आणि त्यांचे सेवेकरी गेल्या दोन दिवसा पासून मंगळवार पेठ येथील मोकळ्या माळावर मुक्कामी होते . त्यामुळे हजारो भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी जमली होती रविवारी प्रस्थानाच्या दिवशी पालखी जलमंदिर येथे आली असता खासदार छ उदयनराजे भोसले यांनी पालखीला पुष्पहार अर्पण करून आपली भक्ती तेथे रुजू केली यावेळी हजारो सातार करांनी बाळूमामाच्या पालखीचे येथे दर्शन घेतले बाळू मामाच्या नावानं चांगभलं म्हणत तेथे हजारो भक्तांनी एकाच वेळी भंडारा आढळला जलमंदिर येथून पालखी पुढे आंबेदरेच्या दिशेने रवाना झाली





