अपक्ष उमेदवारांचा पुन्हा पक्षाचे चिन्ह लावून प्रचार सुरू

135
Adv

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थक व सध्या अपक्ष उमेदवार असलेले विकास देशमुख व अर्चना कांबळे यांच्याकडून भाजपच्या चिन्हा च व नेत्यांचे फोटो टाकून प्रचार सुरू सार्वजनिक बांधकाम मंत्री कारवाई करणार का याकडे सातारकरांचे लक्ष

कालच भाजपच्या वतीने एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केल होती की सातारा जिल्ह्यातील विविध नगर पालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजपकडून ज्यांना अधिकृत एबी फॉर्म दिले आहेत, तेच पक्षाचे अधिकृत उमेदवार मानले जातील. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी न मिळालेल्या काही लोकांनी अपक्ष अर्ज भरले असून अशा उमेदवारांनी प्रचार साहित्यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय, राज्य तसेच जिल्हा स्तरावरील वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरल्याचे निदर्शनास आले आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार नसलेल्या लोकांनी भाजप नेत्यांचे फोटो वापरू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ.अतुल भोसले यांनी दिला होता आता याला दस्तूर खुद्द मंत्री महोदय यांच्या समर्थन करूनच तिलांजली देण्यात आली आहे

भाजप जिल्हाध्यक्ष अतुल भोसले नुसता शो करण्याचे कामाचे आहेत त्यांच्या मतदारसंघात सर्व पक्ष एकवटले व निवडणुकीला सामोरे गेले जिल्ह्यात ते काय पक्ष वाढवणार स्वतःच पक्ष संपवण्यासाठी अतुल भोसले प्रयत्न करतात की काय अशीच आता शंका लोकांनच्या मनात उपस्थित होत आहे निदान निवडणुकीच्या काळात तरी जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते मात्र त्यांना फोनही साधा घेता येत नाही हेच जिल्ह्याचे दुर्दैव म्हणावे लागेल त्यामुळे आमदार तथा जिल्हाध्यक्ष संपर्कात कधी येणार याकडे आता लक्ष लागले आहे

Adv