Monday, October 19, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City छ उदयनराजेंच्या भेटीत वाई-खंडाळा-महाबळेश्वरच्या विकासावर सविस्तर चर्चा

छ उदयनराजेंच्या भेटीत वाई-खंडाळा-महाबळेश्वरच्या विकासावर सविस्तर चर्चा

134
Adv

सातारा : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांची आज त्यांच्या निवासस्थानी युवा नेते विराज भैय्या शिंदे व सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. ऋतुजाताई विराज शिंदे यांनी कार्यकर्त्यांसमवेत सदिच्छा भेट घेतली. यावेळी वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे तसेच आगामी काळातील विकासकामांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी सौ. ऋतुजाताई विराज शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांसाठी व बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, विकास कामे आणि लोकहिताच्या उपक्रमांची माहिती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांच्यासमोर मांडली. तसेच आपल्या विभागामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावाही त्यांनी सादर केला.
खासदार छ उदयनराजे भोसले महाराज यांनी विविध विकासकामांची तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जाणून घेतली. झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी सौ. ऋतुजाताई शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी सौ. ऋतुजाताई विराज शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आले. या भेटीदरम्यान जनतेच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्यासोबतच वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला आगामी काळात अधिक गती देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
या सदिच्छा भेटीमुळे मतदारसंघातील विकासकामांना नव्या दिशेने चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Adv