Friday, September 4, 2026
spot_img
Home Satara District Karad लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेतून कराड शहरासाठी कोट्यवधींच्या कामांना हिरवा कंदील….

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेतून कराड शहरासाठी कोट्यवधींच्या कामांना हिरवा कंदील….

220
Adv

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजना 2025-26 मधून कराड शहरासाठी विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाली आहेत.

या योजनेअंतर्गत एकूण रु. 2,16,62,252/- (दोन कोटी सोळा लाख बासष्ट हजार दोनशे बावन्न रुपये) इतक्या निधीची तरतूद करण्यात आली असून, या माध्यमातून शहरातील मूलभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच सामाजिक पायाभूत सुविधांशी संबंधित कामांचा समावेश आहे.

या विकासकामांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात सुधारणा होणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. या मंजुरीबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

कराड शहराच्या विकासासाठी असेच विविध उपक्रम राबवून शहर अधिक सक्षम आणि सुविधायुक्त करण्याचा संकल्प नगरपरिषद करत आहे.

Adv