स्वीकृत नगरसेवकपदासाठी अनेक जण इच्छुक

13
Adv

सातारा पालिकेच्या स्वीकृत सदस्यांची निवड येत्या 22 तारखेला होणार आहे हद्दवाढ भागात स्वीकृत सदस्य पदाची संधी मिळावी अशी इच्छा तेथील कार्यकर्त्यांची दिसते

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शाहूपुरी विलासपूर शाहूनगर गडकराळी या भागाला स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली तर याचा उपयोग खासदार गटाला ताकद मिळाल्या सारखे होणार आहे त्यामुळे हद्दवाढ भागातच जास्त करून नगरसेवक पदाला संधी द्यावी अशीच मागनी खासदार गटाचे कार्यकर्ते करणार आहेत

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे शाहूपुरी ग्रामपंचायतीची सत्ता बरेच काळ होती त्यामुळे असंख्य कार्यकर्ते शाहूपुरी मध्ये आहेत गडकराळी विलासपूर आदी ठिकाणीही कार्यकर्त्यांचे जाळे असून कार्यकर्त्यांना ताकद मिळाला तर ते अधिक जोमाने काम करतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची दिसते

Adv