ज्या नेत्यामुळे आपल्याला भाजप पक्षाचे तिकीट मिळाले त्या नेत्याचा आत्मसन्मान पक्षात राखत नसतील तर नगरसेवक पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पहिला आपल्या नेत्याचा आत्मसन्मान राखून जो कोणी व्यक्ती अशा भानगडी करत असेल त्याला जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
शुक्रवारी तीन कार्यक्रम संपन्न झाले अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पोलिस वसाहतीच्या इमारतीचे उद्घाटन व जिल्ह्यातील भाजप नगराध्यक्षांचा व नगरसेवकांचा सत्कार असे तीन कार्यक्रम साताऱ्यात झाले. मात्र, या तीनही कार्यक्रमांना भाजपचे लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहिले नाहीत. उदयनराजे व त्यांच्या समर्थकांना अलिकडच्या काळात साताऱ्यात होत असलेल्या विविध
उपक्रमांमध्ये डावलले जात आहे, त्यांचे महत्त्व कमी केले जात आहे,
त्यांना विचारात न घेता पक्षातही निर्णय घेतले जात असल्याच्या
उदयनराजे समर्थकांच्या तक्रारी असल्याचे समजते त्यावरून उदयनराजे नाराज असल्याचीही चर्चा आहे त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमांना उदयनराजेंनी पाठ फिरविल्याची कुजबूज सुरू होती उदयनराजेंच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू होती.






