सागर पावशे यांनी घेतली छत्रपती उदयनराजे यांची भेट

143
Adv

नगरसेवक अशोक मोने यांच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीला सुरुंग लावून पालिका निवडणुकीत निवडून आलेले सागर पावशे यांनी पुणे येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली पालिकेत छत्रपती उदयनराजे नेतृत्वातच कामकाज करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली असल्याचे समजते

सातारा पालिकेत भाजपच्या विरोधात 8 अपक्षांनी विजय मिळाला 6 अपक्ष उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नेतृत्वात आता पालिकेत काम करणार असून खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विचारांच्या नगरसेवकांची संख्या पालिकेत जास्त असल्याने पालिकेत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याच बोलबोला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे

स्वतंत्र लढती झाल्या असत्या तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नगराध्यक्ष सहित सातारा पालिकेवर एकतर्फी विजय मिळवला असता अशी चर्चा आता अपक्षांच्या भेटीनंतर साताऱ्यात रंगत आहे

Adv