नक्की नगरसेवक शंकर किर्दत कोणाकडे

188
Adv

नगरसेवक शंकर किर्दत यांनी आपला पाठिंबा सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे नेतृत्वाखाली भाजपला असल्याचे संगितले त्यानंतर त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे समर्थक माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती सुनील काटकर व जितेंद्र खानविलकर यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

नगरसेवक शंकर किर्दत यांना निवडून आणण्यासाठी अनेक समर्थकांनी मदत केली असल्याचे खाजगीत बोलले जात आहे त्याचे कुटुंब पहिल्यापासून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वालाच मान्यता देते मात्र त्यांच्या या डबल भूमिकेला त्यांच्या कुटुंबातील काहींचा विरोध असून नक्की शंकर किर्दत कोणाकडेहे कळायला मार्ग नाही

राजकारणात भूमिका ही स्पष्ट असायला पाहिजे एक वेळ विरोधक म्हणाले तरी चालेल पण गद्दार हा कलंक लागला तर फार दुर्दैवी असतो साताऱ्यातील नगरसेवक किर्दत हे त्या पदाला अपवाद ठरू नये अशी चर्चा रंगत आहे

Adv