उपनगराध्यक्षपदी तीन दिग्गज नावे चर्चेत

109
Adv

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर उपनगराध्यक्ष व सभापती पदांच्या पदांवर वर्णी लागण्यासाठी रस्सीखेच चालू असून उपनगराध्यक्ष पदासाठी अनुभवी असलेले माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे दिगजना धक्का देणारे सागर पावशे व प्रशांत आहेरराव यांची नावे चर्चेत असल्याचे बोलले जात आहे

नगराध्यक्षपदी भाजपचा नगराध्यक्ष विराजमान झाला असून आता उपनगराध्यक्ष पदाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यामध्ये मागच्या कार्यकाळात अनुभवी म्हणून काम केलेले मनोज शेंडे यांचे पारडे जड असून माजी नगराध्यक्ष अशोक मोरे यांना पराभूत करून आपला ऐतिहासिक ठसा उमटवणारे सागर पावशे हेही या रेसमध्ये असल्याचे दिसून येते

नगराध्यक्ष अमोल मोहिते व प्रशांत आहेरराव यांचा प्रभाग एकच असल्याने येथून प्रशांत आहेरराव हे निवडून आल्याने त्यांनाही संधी मिळेल अशी आशा कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे त्यामुळे एकंदरच उपनगराध्यक्ष पदासाठी मनोज शेंडे सागर पावशे प्रशांत आहेरराव यांची नावे चर्चेत आहेत

Adv