श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनाने सातारा पालिकेवर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष विराजमान झाला आहे
सातारा पालिकेत भाजपची सत्ता असली तरी खरा खेळ हा अपक्षानेच केला सातारा पालिकेत तब्बल सात अपक्ष निवडून आले असले तरी हे मूळचे हे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व त्यांचे विचारांचेच असल्याने सातारा पालिकेवर पुन्हा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी झालेल्या निवडणुकीत ना कुठली प्रचार सभा घेतली ना कुठली पद यात्रा केली तरीही त्यांच्या विचाराचे अपक्ष सात उमेदवार निवडून आल्याने समोरासमोर लढत झाली असती तर काय झालं असतं अशीच चर्चा आज साताऱ्यात रंगत आहे






