आमदार अतुल बाबांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दणका

41
Adv

मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण व सातारा जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कराड शहरातील अनेक मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. कराडचे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक श्री. राजेंद्र (आप्पा) माने, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उभे राहिलेले माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रजीत गुजर, माजी विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान व युवा नेते संजय कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.

मुंबईतील भाजपमधील आजचा पक्ष प्रवेश सोहळा एक झलक असून दुसऱ्या टप्यात शहरात आणखी महत्वाचे प्रवेश भाजपमध्ये होतील. या प्रवेशामुळे कराड परिसरातील भाजपचा जनाधार अधिक मजबूत होईल आणि कराडच्या विकासाला नव्या दिशा मिळेल, असा विश्वास आ.डॉ. भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्या आधीच कराडच्या यशवंत विकास आघाडी यांच्याबरोबर असलेल्या नगरसेविका स्मिता हुलवान भाजप पक्षात प्रवेश केला त्यामुळे शिवसेनेला हा एक धक्काच मानला जातोय अशी चर्चा कराड शहरात आज रंगत होती

स्मिता हुलवान यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्याने आमदार अतुल भोसलेंची ताकद शहरात वाढली असून येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा राजकीय सुतळी बॉम्ब फुटला की काय अशी चर्चा कराड शहरात ऐकायला मिळत आहे

Adv