रविवारी साता-यात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

25
Adv

दि.14 सप्टेंबर रोजी सातारा शहरामध्ये सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेवेळी वाहतूकीस अडथळा येवू नये यासाठी सकाळी 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत वाहतूकीत बदल करण्यात येत असून नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात पोलीस परेड ग्राउंड येथून होवून पोवई नाका – मरिआई कॉम्प्लेक्स – शाहू चौक -आदालत वाडा मार्गे -समर्थ मंदिर बोगदा –यवतेश्वर – प्रकृती हेल्थ रिसॉर्टच्या पुढे ५०० मीटर पासून वळून परत त्याच मार्गाने समर्थ मंदिर – अदालत वाडा -नगरपालीका -शाहू चौक -मरिआई कॉम्प्लेक्स -पोवई नाका मार्गे – पोलीस परेड ग्राउंड येथे येणार येणार आहे. हा मार्ग रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशामक दलाची वाहने वगळून सर्व वाहनांना स्पर्धा कालावधीमध्ये प्रवेश बंद राहिल.

नागरिकांनी वाहतुकीकरीता पर्यायी मार्गाचा वापर करावा.

शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोली मार्ग सातारा शहरात येणारी सर्व वाहने ग्रेड सेपरेटर मार्गाने डी.बी.कदम मार्केट – राधिका सिग्नल येथून सातारा शहरात ये-जा करतील.

बॉम्बे रेस्टॉरंन्ट चौकातून सातारा शहरात येणारी सर्व वाहने जिल्हा परिषद चौक -कनिष्क हॉल चौक -रिमांड होम मार्ग -जुना आर.टी.ओ.चौक -अथवा बांधकाम भवन, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय चौक- मुथा चौक -रिमांड होम मार्गे – जुना आर.टी.ओ.चौक- सुभाषचंद्र बोस चौक (भुविकास चौक) मार्गे सातारा शहरात ये-जा करतील.

मुख्य बसस्थानक- राधिका सिग्नल- तहसिल कार्यालय मार्गे राष्ट्रीय महामार्ग कडे जाणारी सर्व वाहने ही ग्रेड सेपरेटर मार्गाने सातारा शहराच्या बाहेर जातील.

सज्जनगड, ठोसेघर, परळी कडून येणारी व जाणारी सर्व वाहने ही शेंद्रे मार्गे खिंडवाडी रोडने शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोली मार्गे सातारा शहरात येणारी सर्व वाहने ग्रेड सेपरेटर मार्गाने डी.बी. कदम मार्केट-राधिका सिग्नल येवून सातारा शहरात ये-जा करतील.

कास बाजूकडून सातारा शहर बाजूकडे येणारी वाहने मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यंत प्रकृती हेल्थ रिसोर्ट बाजु कडुन सातारा बाजूकडे येणार नाहीत ती पर्यायी मार्गाने एकीव फाटा एकीव-मोळेश्वर-कुसुंबीमुरा-कुसुंबी -मेढा मार्गे सातारा शहराकडे येतील.

हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेकरीता येणारे स्पर्धकांनी व नागरीकांनी आपली वाहने ही प्रशासकिय इमारतीचे समोरील मोकळया मैदानामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद ग्राऊंड रस्त्यांचे दोन्ही बाजुस, जुना आर.टी.ओ.चौक ते वाढे फाटा जाणारे रोडचे एका बाजुस, निर्मला कॉन्वेंट विद्यालय, सदर बझार परिसरात रोडचे एका बाजुला पार्क करावीत.

Adv