उत्पानशुल्कमंत्र्यांना अवैध दारू भेट देणार विलासबाबा

137
Adv

जावली तालुक्यातील महिला रणरागिनींनी १७ वर्षापूर्वी संपूर्ण तालुका दारूदुकानमुक्त केला.पण हप्तेखोरीच्या रोगाची लागण झाल्याने बाजारपेठांच्या गावात दोन-चार अवैध दारूविक्रेते आम्ही २० ते ३५ हजार हप्ता देतो त्यामुळे आमचे कोणीच काही करू शकत नाही अशा थाटात पानटपर्‍या,चिकन-मटण दुकाने, हाॅटेल-ढाबा व बंद कॅबिन यांचा आडोसा घेवून खुलेआम अवैध दारू विक्रीची दुकानेच थाटली आहेत.

लुटुपुटुच्या होणार्‍या कारवाया, १ दारूची बाटली व १ पाचशे नोट देवून नशाबाज अंगावर घेत असलेल्या केसेस यामुळे मुख्य सुत्रधार नामानिराळा रहावून ताठमानेने समाजात फिरताना दिसतो. यासाठीच व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून गुरूवर्य बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक व दारूबंदी चळवळीतील कार्यकर्ते श्री विलासबाबा जवळ यांनी अवैध दारू विक्री विरोधात एल्गार पुकारला असून कोणत्याही परिस्थितीत १५ ऑगष्ट नंतर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना.अजितदादा पवार यांना अवैध दारू भेट देण्यावर ठाम असल्याचे सांगितले.
जावळी तालुक्यातील अवैध दारू विक्री व मटका धंद्याच्या विरोधात यापूर्वीच ४ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख व उत्पादन शुल्क विभाग यांना निवेदनाद्वारे व्यसनमुक्त संघाचे वतीने विलासबाबा जवळ यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तदनंतर गेल्या महिन्याभरात उत्पादन शुल्क विभाग व पोलिस विभागाने काही कारवाई केल्या असून मेढा विभागात याचा परिणाम थोडा दिसत असला तरी सायगाव,कुडाळ व करहर विभागात परस्थिती जैसे थे असल्याचे दिसत आहे.
उत्पादन शुल्क विभागाने मा.जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे उपस्थितीत २९ जुलै रोजी बैठक आयोजीत केली होती.हि चळवळ राज्याला दिशा देणारी असल्याने आपण कर्तव्य भावनेतून कारवाई करून चळवळीला सहकार्य करावे अशा सुचना त्यांनी उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासनाला दिल्या. जावळीचे तहसिलदार यांना फोनवरून तालुकास्तरीय अवैध दारूबंदी समिती स्थापन करून तातडीने बैठक घेवून उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. मा.तहसिलदार जावळी यांनी ३१ जुलै रोजी तातडीने अवैध दारूबंदी समितीची मिटींग बोलावून झालेल्या कारवाईं बाबत उत्पादन शुल्क विभाग व पोलिस विभागाकडून माहिती घेतली यामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून विलासबाबा यांनी झालेल्या कारवाईंबाबत समाधानी नसल्याचे मत नोंदविले.
गेल्या एक महिन्याच्या कालावधित झालेल्या कारवाई समाधारक नसल्याने मेढा सायगाव, कुडाळ व करहर विभागातील प्रमुख विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई होत नसल्याने आम्ही आंदोलनावर ठाम असल्याचे विलासबाबा जवळ यांनी म्हंटले आहे.

Adv