सातारा शहरात फ्लेक्स बंदीच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले त्यांनी घेतलेली भूमिका स्वागतहार्य असून त्यांच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिली
सातारा शहर हे ऐतिहासिक असून दिवसेंदिवस फ्लेक्स बाजी मुळे शहराला बकालपणा येत होता गोलबाग, प्रतापसिंह हायस्कूल, मोती चौक देवी चौक सातारा नगरपरिषद समोरील चौकात फ्लेक्समुळे विद्रीपी प्रकरण झाले होते त्यामुळे इथून पुढे प्रशासनाने आता कुणाची तमा न बाळगता अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करावी अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी व्यक्त केली
पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांची आता जबाबदारी वाढली असून जे कोणी रस्त्यावर मोठे अनधिकृत फ्लेक्स लावतील त्याच्यावर तातडीने कार्यवाही करून संबंधितवर गुन्हा दाखल करावा व मंत्री महोदय यांनी केलेल्या आव्हानाला कुठे हि धक्का लागू नये अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली व्यक्त केली