हॉटेल वुमन्स पॉईंट फॅमिली रेस्टॉरंट महिलांच्या मनोरंजनाचे हक्काचे ठिकाण

12
Adv

स्वाभिमानी महिला सखी मंचच्या अध्यक्ष समताताई मनोज घोरपडे आणि कार्याध्यक्ष तेजस्वीनीताई संग्राम घोरपडे ,यांच्या हस्ते सातारा खिंडेवाडी येथील सोनगाव रोड वरती एस. पी. एस.कॉलेजचे शेजारी हॉटेल वुमन्स पॉईंट फॅमिली रेस्टॉरंटचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी बोलताना समताताई घोरपडे म्हणाल्या या हॉटेलचे वैशिष्ट्य हे हॉटेल महिला चालवत असून महिला साठी स्वतंत्र्य बैठक व्यवस्था आहे. या ठिकाणी महिलांना सर्व प्रकारचे खेळ खेळण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारचे हॉटेल सातार मध्ये कुठेही नाही त्यामुळे महिलानसाठी एक खास आणि मनोरंजनाचे ठिकाण तयार झालेले आहे.
यावेळी बोलताना तेजस्विनीताई घोरपडे म्हणाल्या या हॉटेलची जी संकल्पना आहे ती एकदम युनिक आहे. अशा प्रकारची थीम घेऊन आजपर्यंत कोणतेच हॉटेल चालू झालेले नाही. इथे येणाऱ्या प्रत्येक महिलेचे मनोरंजन कसे होईल याची काळजी या मॅनेजमेंटच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरच सातारा जिल्ह्यातील सर्व महिलांच्या पसंतीचे ठिकाण म्हणून हॉटेल वुमन्स पॉईंट फॅमिली रेस्टॉरंट नावारूपास येईल. यावेळी नेहा दोशी मॅडम,सारिका निकम, मनीषा शेडगे, शितल राऊत, पल्लवी कदम,अश्विनी शेळके,छाया कदम, माधुरी जाधव,सुहासिनी पवार,आरती ढाणे,मीना शिंगाडे पाटील,आदी महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवर यांचे स्वागत प्रगती साळुंखे यांनी केले.

Adv