साताऱ्यातील गणेश मंडळांनी घेतली छ उदयनराजे यांची भेट

30
Adv

सातारा सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची गणेशोत्सवाच्या अडीअडचणी संदर्भात भेट घेतली

सातारा सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव उत्सव समितीचे पदाधिकारी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आले होते. त्यांनी राज्योत्सवाचा दर्जा लाभलेल्या गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी सातारा शहर व परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांना लागणाऱ्या शासकीय सवलती, आर्थिक अनुदान, परवानग्या, आणि विविध प्रशासकीय सहकार्य मिळवून देण्याची विनंती निवेदनाद्वारे केली.

सदर मागण्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अभ्यासपूर्वक ऐकून घेतल्या आणि त्यावर सकारात्मक चर्चा झाली. सार्वजनिक सण-उत्सव हा समाजात एकात्मता, संस्कृती आणि भक्ती यांचा संगम घडवणारा भाग असतो. त्यामुळे या परंपरेच्या जतनासाठी आणि मंडळांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी स्वतः शासन दरबारी योग्य त्या पातळीवर पाठपुरावा करेन,असे आश्वासन मंडळाला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा वारसा जपताना, आमचे छत्रपती घराणे नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक कार्यामध्ये अग्रस्थानी राहिले आहे. मंडळांची कळकळीची भावना आणि संस्कृतीविषयीचा आदर लक्षात घेता, आम्ही यापुढेही अशीच साथ देत राहणार असल्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले

Adv